Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

'Narkasur' वरुन मंत्र्यांत आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नरकासूर प्रथेचे केले समर्थन

दैनिक गोमन्तक

राज्याच्या पर्यटन खात्याने नरकासूर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल टीका करणारे आता नरकासूर बनवण्यासाठी पैसे देतायेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नरकासूर प्रथा बंद करावी, असे वक्तव्य केले होते. यावरुन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामूळे 'नरकासूर' वरुन मंत्र्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत.

( Tourism mantri defends dept’s Narkasur contest)

मिळालेल्या माहितीनुसार गोवेकरांनी नरकासूर करणे बंद करावे आणि राजकीय नेत्यांनीही अशा गोष्टींसाठी देणगी देऊ नये, ही प्रथा बंद करणे आवश्यक असल्याचं असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दोन दिवसांपुर्वी म्हटले होते. असे असताना पर्यटन मंत्री खंवटे यांनी या प्रथेचे समर्थन केले आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये नरकासूर प्रथेवरुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

याबाबत बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की,“काही लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतात, जे आज नरकासूर नको म्हणतायेत तेच पुतळ्यासाठी दानही देतात, असे सांगत यापुढे नरकासूर प्रथेवरुन राजकारण होता कामा नये. कारण ती गोवा राज्यातील अनेक वर्षांची परंपरा असल्याचं खंवटे यांनी म्हटले आहे.

गोवा पर्यटन विभागाने 'नरकासूर स्पर्धा 2022' या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन केले आहे. नरकासूराचा वध म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय असल्याचं मंत्री खंवटे म्हणाले, तसेच पर्यटन मंत्रालय यापुढे राज्यातील सण उत्सव साजरे करताना यासाठी विशेष कार्यक्रम आयोजन करण्याचा विचार करत आहे. अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.

“राज्यातील पर्यटन विभागास काही मोठ्या सणांच्या प्रचारापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही. तर राज्यातील सण - उत्सव साजरे करताना त्यांच्या प्रचारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली आहे. याचे उदाहरण देताना माशेल येथील पारंपारिक 'चिखल कालो' साजरा करण्यासाठी प्रचारही करणार असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

Arpora Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; फरार सचिव रघुवीर बागकर अखेर गजाआड! हणजूण पोलिसांची कोलवाळेत कारवाई

Goa Latest Updates: ईडीच्या कार्यालयासमोर गाड्यांचा ताफा

SCROLL FOR NEXT