Representative image Unsplash
गोवा

Tourism in Goa: आम्हाला वाटते पर्यटन सुरु व्हावे पण...

कोविडची (COVID-19) स्थिती बघता सध्यातरी पर्यटन पूर्णपणे सुरु करता येणार नाही, असे गोव्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर (Manohar Babu Ajgaonkar) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात (Goa) पर्यटन (Tourism) हा मुख्य व्यवसाय आहे. पर्यटन लवकर सुरु व्हावे, असे मलाही वाटते. पण कोविडची (COVID-19) स्थिती बघता सध्यातरी पर्यटन पूर्णपणे सुरु करता येणार नाही, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर (Manohar Babu Ajgaonkar) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

गोव्यात सध्या कोविड नियंत्रणात आहे, मात्र हॉटेल व्यवसाय अजूनही सुरु झालेला नाही. त्यामुळे इतर व्यवसायवरही त्याचा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीही कोविडमुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. राज्य अजूनही त्यातून सावरलेले नाही.

त्यामुळे यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होणार की नाही, याबाबत पर्यटनमंत्र्यांनाही सांगता आले नाही. राज्यात कॅसिनो, मसाज पार्लर, सिनेमागृहे अजूनही बंदच आहे. राज्य सरकारने सोमवारीच संचारबंदीचा आदेश काढला मात त्या आदेशात काही बदल झालेला नव्हता. त्यामुळे पर्यटन क्षेत्र पूर्णपणे कधी खुले होणार हे अजूनही स्पष्ट नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही पर्यटक कोविडचे निगेटिव्ह प्रमाणपत्र घेउन गोव्यात प्रवेश करीत आहेत. ही संख्या मोजकीच आहे. त्यामुळे हॉटेल उद्योजकांना त्याचा काही विशेष फायदा होताना दिसत नाही. पर्यटनाशी संबधित सर्वच ॲक्टीव्हिटिज बंद असल्याने पर्यटकांचीही नाराजी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT