total of 24 nominations were filed today from all four constituencies in murmugoa Dainik Gomantak
गोवा

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून आज एकूण 24 उमेदवारी अर्ज दाखल

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा विधानसभेच्या 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शुक्रवार शेवटच्या दिवशी मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून एकूण 24 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर अर्ज भरण्याच्या चारही दिवसात मिळून कुठ्ठाळी, दाभोळी, वास्को व मुरगाव मतदार संघात मिळून एकूण 57 अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज छाननी शनिवार (दि. 29) रोजी होणार तर अर्ज मागे घेण्याची तारीख 31 जानेवारी असून उमेदवारांची अर्ज संख्या कमी होणार आहे.(total of 24 nominations were filed today from all four constituencies in murmugoa for goa assembly election)

total of 24 nominations were filed today from all four constituencies in murmugoa

विधानसभा निवडणुकीसाठी Goa Assembly Election उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया शुक्रवार दि. 21 पासून सुरू झाली. तर आज या प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. दरम्यान आज शेवटच्या दिवशी मुरगाव Murmugoa तालुक्यातील चारही मतदारसंघातून एकूण 24 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात कुठ्ठाळी मतदारसंघातून आज आंतोनियो वाझ (अपक्ष), तुळशीदास नाईक (भाजप डमी), लोपिन्हो झेवियर (काँग्रेस डमी), भक्ती खडपकर (शिवसेना), एलिना साल्ढाणा (2 अर्ज आप), फातिमा फुर्तादो (आप डमी) असे मिळून एकूण 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एकूण उमेदवारी संख्या 19 झाली आहे.

दाबोळी मतदारसंघातून आज महेश भंडारी (तृणमूल काँग्रेस), संचिता पेरनी (आप डमी मिळून दोन) उमेदवारी अर्ज. तसेच पूर्वीचे मिळून एकूण उमेदवारी अर्ज संख्या 9 झाली आहे.

वास्को मतदार संघातून Vasco Constituencies आज एकूण 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात शमी साळकर (भाजप डमी), कार्लुस आल्मेदा (काँग्रेस), कृष्णा साळकर (भाजप), सुनील लोरेन ( आप), संदीप शेट्ये (जय महाभारत पार्टी), लोरेटा श्रीधरन (आप डमी), चंद्रशेखर वस्त (निज गोयकार रिव्होल्युशन फ्रंट ) यांनी आपले अर्ज सादर केले. एकूण वास्को मतदारसंघातून एकूण 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

मुरगाव मतदार संघातून आज एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात जयेश शेटगावकर (तृणमूल काँग्रेस) परेश तोरस्कर ( रिव्होल्यूशन गोवन पार्टी), परशुराम सोनुर्लेकर ( आप दोन अर्ज), गोपाळ कांबळी (दोन अर्ज आप डमी) शेफी अकबर (राष्ट्रवादी काँग्रेस), इनायतुल्ला खान (अपक्ष) यांनी आपले अर्ज सादर केले. तर एकूण अर्ज संख्या 14 झाली आहे. दरम्यान मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात मिळून एकूण अर्ज संख्या 57 एवढी झाली आहे. उद्या अर्ज छाननी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT