Goa Election: भाजपाचे नेते कधीच स्वहिताचा विचार करत नसतात: तानावडे

अखेर सिद्धेश नाईक यांची नाराजी झाली दूर
पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे (Goa BJP) गोवा  प्रदेशअध्यक्ष सदानंद शेट तानावडे.  सोबत प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व नूतन प्रदेश सचिव आणि जिल्हा पंचायत सदस्य  सिध्देश नाईक .
पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे (Goa BJP) गोवा प्रदेशअध्यक्ष सदानंद शेट तानावडे. सोबत प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व नूतन प्रदेश सचिव आणि जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश नाईक .Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पक्षाचे कुंभारजुवे मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांची नाराजी दूर झाली असून पक्षाने त्यांना गोवा प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज दिली. पणजी येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व सिद्धेश नाईक उपस्थित होते. (Goa BJP leaders never think selfishly statment by Sadand sheth Tanawade)

पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे (Goa BJP) गोवा  प्रदेशअध्यक्ष सदानंद शेट तानावडे.  सोबत प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व नूतन प्रदेश सचिव आणि जिल्हा पंचायत सदस्य  सिध्देश नाईक .
Goa Election 2022: बाणावली काँग्रेस गट अध्यक्षांचा तृणमुल पक्षात प्रवेश

14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी Goa Assembly Election अनेक नेत्यांंची भाजपची उमेदवारी आपणास मिळावी अशी अपेक्षा होती . मात्र सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. भाजपा हा देश प्रथम आणि पक्ष प्रथम या तत्त्वावर चालणारा पक्ष असून भाजपाचे Goa BJP नेते कधीच स्वहिताचा विचार करत नसतात. त्यामुळे पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यासोबत राहणे महत्त्वाचे असते. माजी मंत्री दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक , भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, जि.पं. सदस्य गिरीश उस्कैकर, नावेली येथील सत्यविजय नाईक आदी अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती . मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसतानाही ते पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे आपण पक्षातर्फे आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्या तर्फे त्यांचे अभिनंदन करत असल्याचे तानावडे यावेळी म्हणाले. सिद्धेश नाईक हे केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव असले तरी त्यांनी तळागाळात भाजपसाठी काम केलेले आहे. विद्यार्थी परिषदेपासून ते युवा मोर्चाचे सरचिटणीस , कुंभारजुवा KumbharJuve भाजपा मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदावर त्यांनी काम केलेले आहे . त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागणे स्वाभाविक आहे. 2017 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी देण्यात बाबत विचार व्यक्त केला आणि सिद्धेश नाईक यांनी त्याला पाठिंबा दिला होता. यावेळीही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली होती आणि ती योग्यच होती . कारण ते जिल्हा पंचायत सदस्य आहेत आणि अनेक वर्षे पक्षाचे काम आहे करत आहे .

पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे (Goa BJP) गोवा  प्रदेशअध्यक्ष सदानंद शेट तानावडे.  सोबत प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व नूतन प्रदेश सचिव आणि जिल्हा पंचायत सदस्य  सिध्देश नाईक .
कुंकळ्ळीत भाजप मंडळ उपाध्यक्ष सुदेश भिसे अपक्ष म्हणून रिंगणात

मात्र केंद्रीय निवडणूक समितीने जुने गोवेच्या सरपंच जेनीता मडकईकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे सिद्धेश नाईक नाराज होणे सहाजिकच होते. मात्र त्यानी पक्ष सोडला नाही की बंडखोरीही केलेली नाही. अशा प्रकारेच अनिल होबळे, गिरीश उस्कैकर आदी अनेक नेत्यांनी पक्षासोबत राहणे पसंत केले आणि या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. असेही तानावडे यावेळी म्हणाले. पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणे यात मोठेपणा नाही तर पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या सोबत राहणे हा मोठेपणा असल्याचेही तानावडे यावेळी म्हणाले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही कधीही आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील नेत्यावर किंवा केंद्रातील नेत्यांवर दबाव टाकलेला नाही ते पक्षाचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी नेहमीच पक्षाचे हित आणि देशाचे हीत याचा विचार केलेला आहे .असे सांगून ज्या ज्या नेत्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षासोबत राहिले त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आपण धन्यवाद देत असल्याचे तानावडे म्हणाले

भाजपच्या सर्वच उमेदवारानी अर्ज भरलेले असून पहिल्यांदाच भाजपने चाळीसही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. असे सांगून आज निवडणुकासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भाजप निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज असून येत्या निवडणुकीत नक्कीच पुन्हा एकदा भाजपाचे सरकार गोव्यात सत्तेवर येणार असल्याचे तानावडे म्हणाले. ज्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याबाबत पक्ष अध्यक्ष म्हणून आपण काही बोलणार नाही. मात्र पक्षाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र यावे .असे आपले आवाहन असल्याचेही तानावडे या वेळी म्हणाले .

पक्षाने घेतलेला निर्णय आपण मान्य केलेला असून आपणाकडे वास्को मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे . आपण तेथे निवडणुकीचे काम करणार आहे. असे सिद्धेश नाईक यांनी यावेळी सांगितले. आपण जरी वास्को मध्ये निवडणुकीच्या काळात काम करत राहिलो तरी, आपले समर्थक कुंभारजुवे मतदारसंघात पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासाठीच काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com