Accident Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झाली भीषण अपघातांची मालिका; 14 जणांनी गमावले प्राण

Goa Accident Case: नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेली भीषण अपघातांची मालिका पंधरवडा संपला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या 15 दिवसांत 16 अपघात झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेली भीषण अपघातांची मालिका पंधरवडा संपला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या 15 दिवसांत 16 अपघात झाले. त्यातील 14 अपघात जीवघेणे ठरले आहेत. केवळ दोनच अपघातांत सापडलेले जखमी झाले आहेत. पर्वरीत आज पहाटे दिव्यांग व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला.

सकाळीच या भीषण अपघाताची माहिती राज्यभर पसरली आणि सारेच हळहळले. या वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत रस्ते अपघातांत 9 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण क्षेत्रे दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना करण्यात येते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अशी अपघातप्रवण क्षेत्रे दुरुस्त केल्याने आता अपघातांचे प्रमाण घटेल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, नववर्षापासून दररोज एक-दोन अपघात होतच आहेत. त्यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण यंदा लक्षणीय आहे.

गोव्याचा निसर्ग आणि आतिथ्यशीलतेमुळे पर्यटकांची पावले हमखास गोव्याकडे वळतात. त्यापैकी बरेचजणांना अपघातांना तोंड द्यावे लागते. पणजी, ताळगाव, भोम आणि वाळपई यासह विविध ठिकाणी चार जीवघेण्या अपघातांनी नवीन वर्षाची सुरवात झाली. पणजीमध्ये माजी नगरसेवक रूपेश हळर्णकर यांचा 21 वर्षीय मुलगा आयुष याची दुचाकी बॅरिकेड तोडून बांधकाम सुरू असलेल्या सीवरेज चेंबरमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

अपघातांचा पंधरवडा

दुसऱ्याच दिवशी, ओपा जंक्शन, खांडेपार, फोंडा येथे दुचारी आणि कुरिअर सर्व्हिस टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात फोंडा येथील सुरेश नाईक या ५५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू झाला. वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांतच राज्यात नऊ मृत्युंची नोंद झाली.

अपघातांची कारणे काय असावीत, याचे विश्लेषण सरकारी यंत्रणा करण्याआधीच वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्घटना होतच आहेत. वेगाने वाहने चालविणे, वाहने चालवताना निष्काळजीपणा, अशी कारणे विश्लेषण करताना समोर येत आहेत. रविवारी रात्री उशिरा अतिवेगामुळे दोन जीवघेणे अपघात झाले.

सुकूर येथे केटीएम आणि हिरो-होंडा दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत केटीएमचालकाचा मृत्यू झाला, तर हिरो-होंडा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शिर्लीमध्ये मडगाव-कुंकळ्ळी महामार्गावर कारवरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने २८ वर्षीय सत्या राजकुमार थोमर या तरुणाचा मृत्यू झाला. नुवे जंक्शन येथे चारचाकी रिक्षावर आदळल्याने रिक्षाचालक ठार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT