Omkar Elephant Dainik Goamantak
गोवा

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Omkar Elephant Goa: गोविंद शेट्ये यांच्या गोठ्यातील साहित्याची नासधूस केली. वन खात्याने या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: तोरसे भागात गेले काही दिवस ठाण मांडून असलेल्या ओमकार हत्तीमुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. या हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याने लोक नाराज आहेत.

रविवारी शेट्येवाडा, तोरसे येथील गोविंद शेट्ये, कृष्णा शेट्ये, सुभाष शेट्ये, मंगेश शेट्ये या शेतकऱ्यांच्या केळी, कवाथे आदी पिकावर ताव मारला. सुपाऱ्यांच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

तसेच गोविंद शेट्ये यांच्या गोठ्यातील साहित्याची नासधूस केली. वन खात्याने या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.

या हत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने वन विभागाला कोणतीही यंत्रणा उपलब्ध करून दिलेली नाही. वनरक्षक केवळ या हत्तीवर नजर ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मात्र हतबलपणे आपले पीक वाया जाताना पहावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT