Torxem Landslide  Dainik Gomantak
गोवा

Morjim News: तोरसेत महामार्गाजवळ कपेलाला धोका; संरक्षक भिंतीची गरज

Torxem Highway: कार्यवाहीकडे ‘एमव्हीआर’ कंपनीकडून चालढकल, कठडे कोसळू लागले

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारच्या आवडीचा कंत्राटदार म्हणून एमव्हीआर कंपनीचा उल्लेख वारंवार केला जातो. कंपनीमार्फत पेडणे तालुक्यातील पत्रादवी ते महाखाजन धारगळपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम एमव्हीआर कंपनी करत आहे.

तांबोसे-मोपा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर ख्रिस्ती वाड्यावर कपेल आहे. या कपेलाला महामार्गांचे रुंदीकरण करत असताना धोका निर्माण झाला आहे.

या ठिकाणी संरक्षण भिंत आणि सर्विस रस्ते करावे. यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर, सरपंच सुबोध महाल, पंच सदस्यांनी आणि अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे अभियंते यांच्याशी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चर्चा करून या कपेलच्या बाजूला संरक्षण भिंत बांधावी, तसेच सर्विस रस्ते केल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना केली होती.

आजपर्यंत एमव्हीआर कंपनीच्या कंत्राट दराने या रस्त्याचे काम हाती न घेता संरक्षण भिंत देखील उभारलेले नाही. त्यामुळे भविष्यात या कपेलाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे हळूहळू कोसळत आहे. हा प्रकार जर असाच चालू राहिला तर कपेलाला धोका निर्माण होऊ शकतो.

या कपेलच्या बाजूची संरक्षण भिंत आणि कठड्यांना धोका निर्माण झाल्याची माहिती सरपंच सुबोध महाले यांनी दिली. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सरकारने या कंत्राटदाराला समज देऊन काम करण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

कामांना चालना देणार

या संदर्भात आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे संपर्क साधला ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ६६ वर जेवढी कामे अर्धवट स्थितीत आहेत, त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केली असून त्यांनी ही कामे लवकर पूर्ण केली जातील. या कामांना चालना देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

Goa Live News:भाजप नेत्यांच्या चुलत भावांचा गोव्यात अवैध नाईट क्लब व्यवसायात सहभाग! – विजय सरदेसाईंचा थेट आरोप

Goa Theft: गोव्यातील हॉस्पिटलमध्ये केली चोरी, मुंबईला गेला पळून; लोकेशन ट्रेस झाल्यामुळे सराईत चोरटा जेरबंद

SCROLL FOR NEXT