Rain
Rain  Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसामुळे वाळपईतील लोकांचे नुकसान

दैनिक गोमन्तक

पणजी: हवामान खात्याच्या वेधशाळेने शनिवारी राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती, त्यानुसार सत्तरी आणि सांगे तालुक्यातील काही भागांत तसेच साखळी येथे सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. काल राज्यात कमाल 34.4 अंश सेल्सिअस तर किमान 27.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (torrential rains causes damage in valpoi goa)

वाळपई भागात काल सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. यामुळे लोकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. आंबेडे येथे संतोष भावे यांच्या गोठाघराचे पत्रे उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्याने गोठाघरात पावसाचे पाणी आल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. आंबेडे येथे रस्त्यालगतचे आंब्याचे झाडे कोसळले.

वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडांची (Trees) पाने आणि इतर कचरा प्रचंड प्रमाणात जमा झाला. सत्तरी तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून रोज सायंकाळी पावसाचे आगमन होत आहे. जोरदार वाऱ्यासह पावसामुळे वीज वारंवार खंडित होत होती. काही गावांत बराच वेळ वीज गुल झाली. मात्र, दिवसभर उष्म्यामुळे हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे दिलासा मिळाला.

सांगे (Sanguem) भागात संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ बनले होते. दोन दिवस तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पण आज दुपारनंतर गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने उष्म्यामुळे हवालदिल झालेल्या लोकांना हायसे वाटले. किमान अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

SCROLL FOR NEXT