Parra Road Dainik Gomantak
गोवा

Parra Road: आता एवढंच राहिलं होतं! पर्रा रोडवर 'टॉपलेस गर्ल'ची कार राईड, व्हिडिओ व्हायरल

पर्रा रोडवर एक युवती टॉपलेस होऊन कार चालवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Pramod Yadav

Parra Road: गोव्यात येणारे काही पर्यटक मौजमजा करण्याच्या नावाखाली विचित्र करामती करताना दिसून येतात. समुद्र किनाऱ्यावर वाहने घेऊन जाणे असो की सार्वजनिक मार्गावर धोकादायक स्टंट करणे, अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध पर्रा रोड येथून एक विचित्र घटना समोर आली आहे.

एक युवती टॉपलेस होऊन कार चालवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मार्गावरील इतर पर्यटक आणि स्थानिक चक्रावून गेले आहे.

पर्रा रोड जो डिअर जिंदगी रोड म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथे नेहमीच पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. दरम्यान, येथून काही विचित्र घटना देखील समोर येत असतात. अशाच विचित्र घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, यात एक युवती टॉपलेस होऊन पर्रा रोडवर कार चालवताना दिसत आहे. वाहनात असलेल्या दुसऱ्या सहकाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला आहे.

हा विचित्र प्रकार पाहून मार्गावरील इतर प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक आश्चर्यचकीत झाले. व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या अश्लील प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

साल 2020 आणि पूनम पांडेचे गोव्यातील अश्लील फोटोशूट

प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने 2020 साली काणकोण येथील चापोली धरणावर अश्लील फोटोशूट केले होते. पूनम पांडेचे हे फोटोशूट चांगलेच वादात सापडले होते. यावरून काणकोण पोलिसांवर देखील रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर कोणकोण पोलिसांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर आता पर्रा रोड परिसरातून आलेल्या घटनेवर लोक आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT