Goa University Dainik Gomantak
गोवा

पुंडलिक नाईक यांच्या साहित्यावर उद्या परिसंवाद

ज्येष्ठ कोकणी साहित्यिक पुंडलिक नाईक यांच्या कथात्मक आणि नाट्यात्मक साहित्यावर परिसंवादाचे आयोजन गोवा विद्यापीठाच्या कोकणी विभागातर्फे

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्येष्ठ कोकणी साहित्यिक पुंडलिक नाईक यांच्या कथात्मक आणि नाट्यात्मक साहित्यावर परिसंवादाचे आयोजन गोवा विद्यापीठाच्या कोकणी विभागातर्फे मंगळवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सेमिनार सभागृहात करण्‍यात आले आहे. लेखक प्रकाश नाईक यांचे बीजभाषण होईल. तसेच कोकणी विभागप्रमुख डॉ. हनुमंत चोपडेकर यावेळी उपस्थित असतील.

पहिल्या सत्रात ‘पुंडलिक नाईक यांच्या कथेतील समाजजीवनाची अंगे’ या विषयावर साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर भाष्य करतील.

‘पुंडलिक नाईक यांच्या कादंबरी/लघुकादंबरीचे समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर डॉ. अरविंद हळदणकर भाष्य करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद कोकणी साहित्यिक देविदास कदम यांचे असेल.दुसऱ्या सत्रात ‘पुंडलिक नाईक यांच्या नाटकातले मिथक’ या विषयावर साहित्यिक प्रकाश पर्येकर भाष्य करतील. तसेच ‘पुंडलिक नाईक यांच्या नाटकातील समाज आणि दैवी संकल्पना’ या विषयावर लोकवेद संशोधक डॉ. पांडुरंग फळदेसाई आपला शोधनिबंध प्रस्तुत करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद लोकवेद संशोधक कमलाकर म्हाळशी भूषविणारआहेत.

परिसंवादाच्या समारोप सोहळ्यात कोकणी विभागप्रमुख डॉ. हनुमंत चोपडेकर प्रमुख पाहुणे म्‍हणून तर सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश पर्येकर सन्माननीय अतिथी या नात्याने उपस्‍थित असतील. परिसंवादाचे मुख्य संयोजक प्रा. नरेश नाईक तसेच उपसंयोजक प्रा. गोरख सिरसाट यांचीही हजेरी असेल. गौरांग भांडिये, पल्लवी गोलतकर, काजल पार्सेकर, स्नेहा मोरजकर, आकाश गावकर आणि महिमा कवळेकर हे विद्यार्थी सत्रांचे आयोजन करतील अशी माहिती कोकणी विभागप्रमुख डॉ. हनुमंत चोपडेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT