International Film Festival Dainik Gomantak
गोवा

Goa आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उद्या ठरणार 75 क्रिएटिव्ह माईन्ड्स!

75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ना उद्या गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे विशेष आमंत्रण.

दैनिक गोमन्तक

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत या वर्षी इफ्फी देशभरातील 75 उदयोन्मुख सिनेमाकर्मीना महोत्सवात स्थान देणार आहे. देशातील मान्यवर निवड समिती या 75 कलाकारांची घोषणा उद्या करणार आहे.

देशातील युवा सर्जनशक्तीला आणि उदयोन्मुख प्रतिभेला शोधून, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival)- इफ्फीमध्ये देशातील युवा सिनेकर्मीकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यांच्यापैकी या 75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ऑफ टूमारो ना गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे विशेष आमंत्रण असणार आहे.

या महोत्सवात ते चित्रपटसृष्टीतील नामवंतांशी चर्चा करू शकतील. महोत्सवादरम्यान होणारे मास्टर क्लासेस, चर्चासत्रे, परिसंवाद यातही ते सहभागी होऊ शकतील. यात निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाचा आणि निवासाचा खर्च इफ्फीच करणार आहे. या 75 सिनेकर्मींची निवड करण्यासाठी दोन निवड समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत.

सिलेक्शन ज्युरी

वाणी त्रिपाठी टिक्कू : निर्माती/अभिनेत्री, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ सदस्य.

अनंत विजय : लेखक आणि चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते

यतींद्र मिश्रा : प्रसिद्ध लेखक, चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते

संजय पुरन सिंग : चित्रपट निर्माते, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते.

सचिन खेडेकर : अभिनेते, दिग्दर्शक

‘ग्रँड ज्युरी’ समितीमध्ये नामांकित गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन (सेन्सॉर बोर्ड) मंडळचे अध्यक्ष प्रसून जोशी, नामांकित दिग्दर्शक केतन मेहता, प्रसिध्द संगीतकार/गायक शंकर महादेवन, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज बाजपेयी, ऑस्कर विजेता ध्वनिमुद्रक रसुल पुकुट्टी, निर्माता/दिग्दर्शक विपुल शहा यांचा समावेश आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केल्याप्रमाणे इफ्फीच्यावतीने निवडण्यात येणाऱ्या या देशातील 75 युवा सिनेकर्मींमध्ये निर्माते, अभिनेते, गायक, पटकथा लेखक, कला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर यांचा समावेश आहे. देशभरातून मागवलेल्या अर्जांमधून सुरुवातीला 150 आणि त्यातून अंतिम 75 सिनेकर्मी इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT