Tomato Rate Dainik Gomantak
गोवा

Tomato Rate : वालपापडी अजूनही खातेय भाव दर चढेच ; टॉमेटोने गाठली साठी

Tomato Rate : पुरुमेंतासाठी मिरची पावडर तसेच मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सध्या बाजारात खरेदी केले जात आहे. गावठी मिरची ५०० ते ७०० रुपये किलो दराने विकली जात असून बेडगी, तेजा व इतर मिरच्यांना देखील मागणी आहे. त्‍यांचा दर ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Rate :

पणजी, राज्यात मागील दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. कांदा, बटाट्याचे दर सोडल्यास इतर भाज्‍यांच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक फळभाज्यांनी तर शंभरी पार केली आहे.

पणजी बाजारात वालपापडी २४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. लसूण ४०० रुपयांवर गेली आहे.

पुरुमेंतासाठी मिरची पावडर तसेच मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सध्या बाजारात खरेदी केले जात आहे. गावठी मिरची ५०० ते ७०० रुपये किलो दराने विकली जात असून बेडगी, तेजा व इतर मिरच्यांना देखील मागणी आहे. त्‍यांचा दर ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी अजून म्‍हणावी तशी उष्म्यात घट झालेली नाही. त्यामुळे लिंबूला अजूनही मोठी मागणी आहे. मध्यम आकाराचे लिंबू ७ रुपयांना एक अशा दराने विकले जात आहे. लहान आकाराची दहा लिंबे ५० रुपये असा दर आहे.

आंब्यांच्या दरात घट

बाजारात मानकुराद, हापूस, केसरी तसेच इतर विविध जातींचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. आवक वाढल्‍याने आंब्यांच्या दरात घट झाली आहे. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला अडीच ते तीन हजार रुपये डझन दराने विकला गेलेला मानकुराद आंबा आता ५०० ते ७०० रुपयांवर आला आहे. हापूस ४०० तर विविध जातींचे आंबे ३०० रुपये डझन दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT