Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालविण्याविरुद्ध विशेष मोहीम ३१ मे ते २ जून या कालावधीत रात्री ८ ते ११ या वेळेत राबविण्यात आली.
Goa Traffic Police has registered 249 cases against drunk driving
Goa Traffic Police has registered 249 cases against drunk driving

Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालविण्याविरुद्ध विशेष मोहीम ३१ मे ते २ जून या कालावधीत रात्री ८ ते ११ या वेळेत राबविण्यात आली. विशेष मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी २४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन दिवसांच्या कालावधीत विशेष मोहिमेत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या गुन्ह्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

वाहतूक पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी नमूद केले आहे की १ मे ते २ जून या कालावधीत एकूण २५८ मद्यधुंद वाहन चालविण्याचे उल्लंघन प्रकरणे नोंद करण्यात आली. १ जानेवारी ते २ जून या काळात मद्यपान करून वाहन चालविण्याचे एकूण २१२४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत फक्त ५०९ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

आत्तापर्यंत तीन जणांना दंडाव्यतिरिक्त एक दिवस ते चार दिवसांपर्यंतच्या साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. मद्यपी चालकास रु. ५००० ते रु. १० हजार अशा दंडाची तरतूद आहे.

कोणत्याही चाचणीत ३० मिलीग्राम प्रति १०० मिली चालकाच्या रक्तात मद्य आढळलेस किंवा ड्रगच्या प्रभावाखाली असल्याचे आढळल्यास ‘पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिने कारावास किंवा दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी, दोन वर्षांपर्यंत कारावासाची मुदत वाढू शकेल, कारावास किंवा पंधरा हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद आहे.

राहुल गुप्ता, वाहतूक पोलीस अधीक्षक

रक्तात दारूचे कोणतेही प्रमाण वाहन चालविण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी लक्ष केंद्रित करण्याची, चांगले निर्णय घेण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. तथापि, मद्य हे या कौशल्यांवर परिणाम करून चालकाचा आणि इतरांचा जीव धोक्यात आणते.

मद्यपान केल्याने प्रतिसादाची वेळ कमी होते, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. मद्य सेवन केल्याने एखाद्याच्या मेंदूला परिस्थितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्याचमुळे मोठे अपघात होतात.मद्यपान करून वाहन चालवू नये आणि इतर रस्ता वापरकर्त्यांचा जीव धोक्यात घालू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com