Tomato Price Hike Dainik Gomantak
गोवा

Tomato Price Hike: टोमॅटो झाला ‘लालेलाल’; दर 80 रुपयांवर; आवक घटली मागणीत वाढ

किरकोळ व घाऊक या दोन्ही बाजारात सध्या टॉमेटोचे दर दुप्पट

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Price Hike: एरवी 15 ते 20 रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या टोमॅटोने आपला ‘रंग’ दाखवायला सुरूवात केली आहे. सध्या टोमॅटोची आवक घटली असून मागणी मात्र वाढली आहे. डाळीसह विविध भाज्यांमध्ये हमखास वापरला जाणारा हा टोमॅटो सध्या सर्वसामान्यांना परवडेनासा झालाय.

आज सोमवारी खुल्या बाजारात लहान टोमॅटो 60 रुपये तर मोठे टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर, सबयार्डमध्ये किरकोळ 60 रुपये तर घाऊक 50 रुपये किलो असा टोमॅटोचा दर आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

किरकोळ व घाऊक या दोन्ही बाजारात सध्या टॉमेटोचे दर दुप्पट झालेले आहेत. परराज्यांतून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने त्‍याचे भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेजारच्‍या राज्‍यांत जास्त पाऊस पडल्याने टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झालाय.

शिवाय दुसरे नवीन पीक येण्यास विलंब झालाय. तो येण्यास अजून पंधरा ते वीस दिवस जातील. त्यानंतर स्थिती सुधारेल, अशी माहिती गोवा कृषी मार्केटिंग बोर्डाचे सदस्य अमेय नाटेकर यांनी दिली.

पंधरा दिवसांत स्‍थिती सुधारेल : प्रेमेंद्र शेट

फलोत्पादन महामंडळाच्या दुकानांमध्‍ये टोमॅटो सध्या 55 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. हे दर आज सोमवारी 52 रुपये किलो होते, तर काल रविवारी हाच दर 54 रुपये होता.

याबाबत फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, फलोत्पादन दुकानात टोमॅटोचे दर सर्वात कमी आहेत.

इतरत्र हे दर 60 ते 80 रुपयांपर्यंत गेलेले आहेत. टोमॅटोचे पीक नष्ट झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. ही स्थिती सुधारण्यास आणखी कमीत कमी 15 दिवस जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT