Sal River Dainik Gomantak
गोवा

Sal River: संतापजनक! शौचालयाचे पाणी थेट साळ नदीत, व्हेंझीनीं उघडकीस आणला प्रकार

आम आदमी पक्ष बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

Pramod Yadav

वेर्णापासून बेतूलपर्यंत वाहणारी साळ ही सासष्टी तालुक्यातील महत्त्वाची नदी असून या नदीच्या काठावर असलेल्या लोकवस्तीसाठी सर्व बाजूंनी ती जीवनवाहिनी ठरलेली आहे. संपूर्ण सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली साळ नदी सध्या पूर्णपणे प्रदूषित झाली असून, मानवी मलमूत्र थेट या नदीत सोडून दिल्याने या नदीतील मासे खाणेही धोक्याचे बनले आहे.

दरम्यान, साळ नदीवरून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. साळ नदीच्या लगत अवैध पद्धतीने शौचालय उभारून त्याचे पाणी थेट नदीत सोडल्याचे दिसून आले. आम आदमी पक्ष बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस (Venzy Viegas) यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

आमदार व्हेंझी व्हिएगस पश्चिम मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. दरम्यान, तात्काळ त्यांनी त्याठिकाणी जाऊन अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले शौचालय उद्धवस्त करून नष्ट केले. पत्र्यांचा वापर करून शौचालय उभारण्यात आले होते.

साळ नदीचे प्रदूषण होत असताना गोवा प्रदूषण मंडळ मात्र याकडे दुर्लेक्ष करत आहे. असा आरोप व्हेंझी व्हिएगस यांनी केला आहे. मंत्री देखील सुशेगाद असून राज्यात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या अवैध गोष्टींबाबत काहीच देणंघेण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेते पन्नास खोके घेऊन एकदम ओके असल्याने अवैध गोष्टी करण्याचे धाडस लोक करत असल्याचे देखील व्हिएगस म्हणाले.

साळ नदीच्या काठावर राहणारी लोकवस्तीच तिच्या मुळावर आली आहे. काही दिवसांपूर्वी शिरवडे नावेली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी साळ नदीत सोडून देण्याच्या प्रकार उघडकीस आला होता. नावेली-कोलमरड या भागात तर या नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांचे मलमूत्र नाल्यातून थेट या नदीत सोडले जात असल्याने या नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील साळ नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली व ती प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाय योजण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT