Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाकडून 'टुगेदर फॉर म्हादई' मोहिम

अध्यक्ष मनोज परब यांची माहिती; विरोधक दुटप्पी असल्याने आम्ही विरोधकांसोबत नाही

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: केंद्रीय जल आयोगाने म्हादई नदीवरील प्रकल्पाच्या कर्नाटकच्या नव्या डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर गोव्यात जनक्षोभ उसळला आहे. तेव्हापासून विविध घटकांतून या विरोधात आवाज उठवला जात आहे. आता रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षानेही म्हादईसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. म्हादई बचावसाठी 'टुगेदर फॉर म्हादई' मोहिम सुरू केल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत पक्ष नेमका काय कार्यक्रम राबविणार आहे, याची माहिती, मनोज परब यांनी दिली. ते म्हणाले की, या मोहिमेंतर्गत मी आणि माझे समर्थक म्हादईसाठी लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. आम्ही आमची म्हाईदबाबतची भूमिका घराघरात नेऊन पोहचवू. तसेच म्हादई बचावसाठी आम्ही सह्यांची मोहिमही राबवणार आहोत.

परब म्हणाले की, म्हादईबाबत विरोधक एकत्र आले आहेत. पण आम्ही या विरोधकांच्या ऐक्यामध्ये नाही. कारण विरोधक दुटप्पी आहेत आणि त्यांना गोवा विकायचा आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

कर्नाटकच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला मंजुरी देण्याला आता आठवडा उलटत आला आहे. सत्ताधारी भाजपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना हा आराखडा मागे घेण्यासाठी निवेदन सादर केले आहे. हा आराखडा तातडीने मागे घ्यावा, यासाठी रविवारी पणजी, प्रियोळ येथे जाहीर सभा झाल्या. 16 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळीत थेट जनआंदोलन करण्याचा निर्धार ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट’ने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT