Toddler dies in house wall collapse Dainik Gomantak
गोवा

शौचालयात गेला असता काही मिनिटांत 'होत्याचे नव्हते', भिंत अंगावर कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; नाणूसमधील दुर्घटना

Toddler dies in house wall collapse: नाणूस-सत्तरी येथे घरातील भिंत अचानक कोसळून अडीच वर्षांच्या झोराईझ आगा या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई : नाणूस-सत्तरी येथे घरातील भिंत अचानक कोसळून अडीच वर्षांच्या झोराईझ आगा या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या घटनेने नाणूस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, झोराईझ आगा हा घरातील शौचालयात गेला असताना अचानक त्याच्या अंगावर भिंत कोसळली. त्यावेळी त्याची आई घरकाम करत होती. भिंत कोसळल्याने झोराईझ ढिगाऱ्याखाली दबला गेला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटना लक्षात येताच कुटुंबीय व उपस्थितांनी तत्काळ धाव घेत ढिगारा बाजूला करून चिमुकल्याला बाहेर काढले. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला तातडीने वाळपई येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) उपचारासाठी नेण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलविण्यात आले. मात्र, गोमेकॉत उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी झोराईझला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, भिंत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली तसेच दुर्घटनेमागील परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे.दरम्यान, चिमुकल्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. झोराईझच्या पश्चात पाच वर्षाचा भाऊ असून, त्याचे वडील कामानिमित्त विदेशात असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT