शिरोडा येथील पत्नीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या पती चेतन गावकर याला एलडीसी पदावरून केले निलंबित. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश. अटक केल्यानंतर ४८ उलटल्याने करण्यात आली कारवाई.
म्हादईचे पाणी वळणाच्या विरोधात बेळगावीमध्ये ग्रामस्थ आणि पर्यावरणवाद्यांनी आज मोर्चा काढून याची सुरुवात केली आहे. हे चांगलं केलेलं आहे. हा प्रश्न अस्तंघाटच्या पाचवीचार जंगलाचा प्रश्न आहे. या जंगलाचे राखण केले तरच बेळगावचा भाग आहे तो सुखी राहू शकतो याची लोकांना जाणीव झाली आहे. सगळ्यांनी एकत्र होऊन काम केलं तर आम्ही आमची जंगले वाचू शकतो नाहीतर कर्नाटक पिण्याच्या पाण्याच्या नावाने सगळी जंगले संपवून टाकणार: राजेंद्र केरकर
गोव्याला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने नेण्यासाठी केंद्र सरकारच्या 'पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजनेची' अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार (दि. ३) रोजी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गोव्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
बस्तोडा मध्ये सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी टपरी मालकावर क्रूर हल्ला केल्याच्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. हल्लेखोरांनी मालकाच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला केला. म्हापसा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कुडचडेमधील बनसाई काकोडा बस स्टॉपजवळील एका शेतात अत्यंत प्रदूषित पाण्याचा साठा आजूबाजूच्या परिसरासाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे, कारण त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर, कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रसना भेंडे यांनी घोषणा केली आहे की, पालिका जागेची पाहणी केल्यानंतर त्वरित कारवाई करेल.
ईदच्या निमित्ताने उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पच्या परिसरात आज पासून दि. १० जून पर्यत जमावबंधी लागू. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश.
आरोग्य मंत्रालयाच्या पोर्टलनुसार, गोव्यात ८ सक्रिय कोविड-१९ रुग्ण आहेत. एका कोविड रुग्णाला जीएमसीमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या, जीएमसीमध्ये एकही कोविड रुग्ण दाखल नाही: डॉ. राजेश पाटील, वैद्यकीय अधीक्षक.
बांदोडा पंचायत क्षेत्रातील उंडीर येथे उभारण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाला ग्रामस्थानी सहकार्य करण्याची गरज - वीज मंत्री सुदिन ढवळीकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.