भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक यांनी हिज ग्रेस आर्चबिशप फिलिप नेरी फेराओ यांच्याशी बैठक घेतली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन काटेकोरपणे आयोजित करण्यात आणि ते यशस्वी करण्यात सरकारच्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक हिज ग्रेस यांनी केले.
एमजीपीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना कोणीतरी दिशाभूल केल्याच्या विधानाला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, "माझी दिशाभूल कोण करणार?"
आयपीएससीडीएलने कामासंदर्भातचा प्रगती अहवाल सादर केला त्याला उत्तर देण्यास याचिकादारानी वेळ घेतल्याने पुढील सुनावणी ९ एप्रिलला.
मुख्यमंत्र्यांची दिशाभूल झाल्याने त्यांनी युतीबद्दल हे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भविष्यात सुद्धा मगो आणि भाजप एकत्र असल्याचे आश्वासन बी.एल संतोष यांनी दिलेय.
सीमांकित जलक्रीडा क्षेत्रात जाऊ नका अशी वारंवार सूचना देऊनही, महाराष्ट्रातील एका ३८ वर्षीय व्यक्तीला जलक्रीडा बोटीची दोरी ओढताना त्याच्या पायाला दुखापत झाली.
मोले अभयारण्य क्षेत्रातील सागवानी लाकडाची चोरी करून रिक्षेत नेताना, चालक दीपक राऊत व सदा सावंत दोघांना रंगेहाथ अटक. वाहन जप्त. वन खात्याची कारवाई.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दम दिल्यानंतर कारापूर-सर्वण पंचायतीला आली जाग. सर्वणसह विविध भागात साचलेला कचरा हटवला.
केशव सेवा साधना विशेष मुलांची शाळा, वाळपईतर्फे 'ऑटीझम दिवस' उत्साहात साजरा. यावेळी विशेष रॅली काढून; ऑटीझम दिवसाचे महत्व सांगणारी चित्रे विद्यार्थ्यांनी नगरपालिका मैदानाच्या भिंतीवर रंगवली.
डिचोलीत विशेष मुलांकडून 'ऑटीझम'विषयी जागृती. शहरात काढली रॅली. 'प्लास्टिक'मुक्तीचाही दिला संदेश.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.