Crime theft Canva
गोवा

Goa News: पणजीतील 4 दुकानांमध्ये चोरी, कोल्हापूरातील तिघे अटकेत; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi News: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये.

Akshata Chhatre

Panaji Theft: पणजीतील 4 दुकानांमध्ये चोरी: कोल्हापूरातील तिघे अटकेत

पणजीतील चार दुकानांमध्ये घुसून 15,000 रुपये आणि एक मोबाईल फोन चोरल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील तीन जणांना पणजी पोलिसांनी अटक केली.

Mhadei Goa: म्हादई प्रकरणात गोवा सरकार अपयशी; सेव्ह गोवा फ्रंटची टीका

म्हादई प्रकरणात गोवा सरकार अपयशी ठरल्याबद्दल सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटने यांनी टीका केली. कर्नाटकातील बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करण्याच्या म्हादई बचाव अभियानाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

Goa Taxi: टॅक्सी चालक विरुद्ध रेंट-अ-कॅब चालक वाद; न्याय देण्याची मागणी

टॅक्सी चालक विरुद्ध रेंट-अ-कॅब चालकांमध्ये ९ एप्रिल रोजी मोपा विमानतळाजवळ एक धक्कादायक घटना घडली, जिथे स्थानिक टॅक्सी चालकांच्या एका गटाने रेंट-अ-कॅब चालकाला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संघर्षात शारीरिक हानीची धमकी देण्यात आली आणि सोबत अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडितांनी यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Goa Politics: दामू नाईकांची मंत्री रवींसोबत बंद दाराआड चर्चा!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री रवी नाईक यांच्याशी फोंड्यात केली बंद दाराआड चर्चा. सुमारे तासभर चालली चर्चा. फोंड्यातील भाजप सुत्रांची माहिती.

LOP Yuri Alemao: एलओपी युरी आलेमाव यांच्याकडून पोलीस आउट पोस्टची पाहणी

अलिकडेच जाहीर झालेल्या पूर्ण पोलीस ठाण्याच्या प्रस्तावित कामासाठी एलओपी युरी आलेमाव यांनी कुंक्कळी मतदारसंघातील चांदोर येथील पोलीस आउट पोस्टची पाहणी केली. समुदायाच्या गरजा पूर्ण करणारा एक व्यापक कायदा अंमलात आणण्याचे उद्दिष्ट आहे. या विकासामुळे स्थानिकांची आणखी एक दीर्घकाळापासूनची आकांक्षा पूर्ण होईल, तर चांदोरचे वारसा गावात रूपांतर होईल असं युरी आलेमाव म्हणालेत.

Goa Culture: साखळीत चैत्रोत्सवाचा उत्साह, शनिवारी सांगता

विठ्ठलापूर साखळीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वर्षपध्दतीप्रमाणे चैत्रोत्सव सुरू असून मोठ्या संख्येने भाविकांची या उत्सवाला उपस्थिती लाभत आहे. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत चालणारा हा उत्सव सोमवारी सुरू झाला असून त्याची शनिवारी हनुमान जयंतीदिनी सांगता होणार. तर रविवारी पहाटे वीरभद्र सादर केला जाणार आहे.

Goa Theft: पणजीत चार दुकानांमध्ये चोरी

बुधवारी (दि. ९) रात्री उशिरा पणजीत चोरांनी चार दुकानांमध्ये घुसून चोरी केली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा.

Goa School Reopen: कळंगुटमधील विद्यार्थ्यांचा दोन शाळांवर बहिष्कार

सेंट जोसेफ माध्यमिक विद्यालय तसेच लिटल फ्लावर ऑफ जीजस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळांवर बहिष्कार टाकला आहे. पालक-शिक्षक संघाकडून याबद्दल पूर्वसूचना देण्यात आली होती.

Jit Arolkar Goa: आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते जलवाहिनी कामाचा शुभारंभ

तूये येथील जलवाहिनी कामाचा आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Ponda News: ग्रामपंचायत कवळे आणि श्री माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित "कार्यकर्तृत्व सन्मान"

लोकसेवेसाठी जीवन वाहिलेल्या व्यक्तींचा सन्मान वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात लोक सेवेसाठी आपले जीवन वाहिलेल्या शिक्षक,आजी माजी पंच सदस्य, डॉक्टर,वकील तसेच इतरांचाही सन्मान करण्यात आला.

Goa News: श्री साळेश्वर कमलेश्वर पतसंस्थेचे मल्टिपर्पज प्रायमरी अँग्री कल्चर कोपरेटिंव्ह सोसायटीत रूपांतर

पेठेचा वाडा कोरगाव येथील श्री साळेश्वर कमलेश्वर नागरी पतसंस्थेचे श्री साळेश्वर कमलेश्वर मल्टीपरपज प्रायमरी अँग्री कल्चर कोपरेटिव सोसायटीत रूपांतर करण्यात आले आहे.संस्थेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेच्या पेठेचा वाडा येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा विभागीय सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी मंगेश फडते उपस्थित होते.

Goa Cashew Festival: राज्यात तीन दिवसांसाठी भरणार काजू महोत्सव

राज्यात तीन दिवसांसाठी भरणार काजू महोत्सव भरणार असल्याची माहिती वन विकास महामंडळाचा अध्यक्षा आमदार डॉ देविया राणे यांनी दिली. महोत्सवाचं हे तिसरं वर्ष असून 25, 26 आणि 27 April रोजी हा महोत्सव भरणार आहे.

Goa Accident: वाळपईत कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक

वाळपईत कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक, दुचाकीवर जखमी, १०८ ने हॉस्पिटलमध्ये रवानगी, सुदैवात जीवित हानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT