Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa News: "मंत्री गोविंद गावडे मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बोलले नाही"; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी मराठीमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

पावसाचा अपडेट; गोव्यात ऑरेंज अलर्ट

आयएमडी गोव्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ३० मे ते १ जून २०२५ पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोविंद गावडेंकडे ती धमक होती परंतु... - रवींद्र वेळीप

पुढील १-३ तासांत ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

पुढील १-३ तासांत उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने आणि ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील ढग मडगाव, केपे, काणकोण इत्यादी तालुक्यांकडे येत आहेत.

"मंत्री गोविंद गावडे मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बोलले नाही"

मंत्री गोविंद गावडे मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बोलले नाही; त्यांनी फक्त लोकांच्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी आमचे अनेक मुद्दे पुढे नेले आहेत: प्रकाश वेळीप, यूटीटीए अध्यक्ष

'विश्वास'ला हाताशी धरून आदिवासी भवनाचा 'घात' - गोविंद शिरोडकर

धारबांदोडा शेतकरी विभाग तर्फे नुकसान भरपाई अर्ज भरण्यास चालू

कुळे राक्षस मळ्ळीकेश्वर संघटनेच्या शेतकऱ्यांचे पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान. धारबांदोडा शेतकरी विभाग तर्फे नुकसान भरपाई अर्ज भरण्यास चालू.

मंत्री गोविंद गावडेंचे हात वर, खापर फोडले मिडियावर!

माझ्या भाषणात मी मुख्यमंत्र्यांबद्दल काहीच बोलेलो नाही. माझ्या वक्तव्यांचा मिडिया कडून विपर्यास. या प्रकरणानंतर मी तात्काळ गोव्यात दाखल होऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र. गोव्यात परतल्यानंतर मंत्री गोविंद गावडेंची पहिली प्रतिक्रिया.

"प्रेमाची २० वर्ष" पत्नी सुलक्षणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

मडगाव येथे सर्वाधिक ३४.२ मिमी पाऊस पडला

२८ मे २०२५ रोजी गोव्यातील विविध पर्जन्यमापक केंद्रांवर गेल्या २४ तासांत पावसाची नोंद झाली. मडगाव येथे सर्वाधिक ३४.२ मिमी पाऊस पडला, तर जुन्या गोव्यात सर्वात कमी ३.२ मिमी पाऊस पडला.

एजे सुपरमार्केटजवळील मारुती बलेनो कारचा ताबा सुटला

सांगोल्डा येथील एजे सुपरमार्केटजवळील मारुती बलेनो कारचा ताबा सुटला आणि ती उलटली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटली.

पेडे-म्हापसा महामार्गावर दुर्दैवी धडक

मंगळवारी रात्री पेडे-म्हापसा महामार्गावर एक दुर्दैवी धडक झाली, ज्यामध्ये दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेल्याने १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी दुचाकीचा शोध घेतला आणि तो १६ वर्षांचा अल्पवयीन असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुचाकीस्वाराचे वडील शब्बीर शेख (४८) आणि मागे बसलेला रिहान शेख (१८) यांना अटक केली आहे. जखमी अल्पवयीन दुचाकीस्वारावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सुरू आहे.

ब्रम्हाकरमळी गावातील सुप्रसिद्ध श्रीब्रम्हदेव देवस्थानाची फंड पेटी फोडली

सत्तरी तालुक्यातील ब्रम्हाकरमळी गावातील सुप्रसिद्ध श्रीब्रम्हदेव देवस्थानाची फंड पेटी फोडणाऱ्या चोरट्याला 48 तासाच्या आत पकडा. ब्रह्मदेव देवस्थान सेवा समितीची मागणी. पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT