गोविंद गावडे आले तर त्यांना सोबत घेणार? या प्रश्नावर 'मांडवीतून खूप पाणी वाहून गेले आहे. मी भविष्यात काय घडू शकते याच अंदाज बांधू शकत नाही, कारण मी देवाकडे बोलत नाही. येतो तो दिवस चांगला असं मानून चालायच', विजय सरदेसाईंनी दिले उत्तर.
गांजा बाळगल्याप्रकरणी डिचोलीत दोन युवकांना अटक. रोहित परवार आणि संदेश कानोळकराला गांजासह अटक. अमलीपदार्थ विरोधी कायद्याखाली डिचोली पोलिसांची कारवाई.
आज सकाळी चोडण येथे एक फेरी बुडाली, ही एक अत्यंत लाजिरवाणी घटना आहे आणि गोव्यातील लोकांचे संरक्षण करण्यात भाजप गोवा सरकारच्या पूर्ण अपयशाची आठवण करून देते. गोव्याच्या अंतर्गत जलवाहतूक व्यवस्थेच्या दयनीय स्थितीबद्दल वारंवार इशारा देऊनही, या निष्काळजी भाजप राजवटीने डोळेझाक केली आहे. आज जीव गेले असते तर काय झाले असते? जबाबदारी कोण घेणार होते? हे केवळ निष्काळजीपणा नाही; ही गुन्हेगारी आहे : अमित पाटकर; गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
कुर्टी येथे गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या ३ कारवर कोसळले चिंचेचे झाड.
सवर्शे सत्तरी येथे भूमिगत वीज वाहिनीच्या खोदलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक कदंबा बस भर रस्त्यात रुतली. सतत पडत असलेल्या पावसामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे.
कुडतरकर नगरी फोंडा येथील असलेल्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट लागलेली आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश. मोठे नुकसान
गवंडाळी धावजेचा रस्ता सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी ठेवणार खुला. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रस्ता राहणार बंद. आमदार राजेश फळदेसाईंची माहिती. मोठ्या प्रमाणात लोक कामा धंद्यानिमीत्त ह्या रस्त्याने पणजीत येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी त्याची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - राजेश फळदेसाई,कुंभारजुवा आमदार
मुळगाव वारकरी संस्थेच्या पंधराव्या पायीवारीला सोमवारी उत्साहात प्रारंभ. विठ्ठलनामाच्या जयघोषात 270 वारकऱ्यांचे पंढरपूरला प्रयाण.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.