Today's Goa Live News Update 24 Feb 2024 Dainik Gomantak
गोवा

Today's Goa News Update 24 Feb 2024: दिवसभरातील ठळक घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Today's Goa Live News Update 24 Feb 2024: गोव्यात दिवसभरात घडणाऱ्या गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडासह इतर क्षेत्रातील घडामोडींचा आढावा.

Pramod Yadav

संजीवनीचे प्रशासक सतेज कामतींना सेवा वाढ नको, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मंत्र्यांना पत्र

संजीवनी साखर कारखान्याचे विद्यमान प्रशासक सतेज कामतींना सेवा वाढ देण्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. सेवा वाढ न देण्याबाबत अखील गोवा ऊस उत्पादक संघटनेचे कृषी मंत्री रवी नाईकांना पत्र.

कामत यांनी कधीच ऊस उत्पादक संघटनेला सहकार्य केलेले नाही तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठीही काहीच केलेले नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आरोप. या महिन्यात सतेज कामत सेवानिवृत्त होणाऱ्या असल्याची पत्रात माहिती नमूद.

केंद्रात 'चार सौ पार' तर गोव्यात 'दोनो पार'!

कोणीही एक झाले तरी लोक भाजपासोबत, त्यामुळे आप आणी काँग्रेस एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. यावेळी 'चार सौ पार' सह गोव्यात 'दोनो पार'. दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपच जिंकेल. मुख्यमंत्र्यांचा पुनरोच्चार.

गोव्याच्या एसटींना राजकीय आरक्षणाची 'मोदी गॅरंटी'!

आजपर्यंत भाजप सरकारांच्या काळातच आदिवासींना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले आहेत. आता गोव्याच्या एसटींना राजकीय आरक्षण देणं ही मोदींची गॅरंटी. राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी सरकार उपाय योजना करत आहे. आणखी जे आवश्यक तेही सरकार करणार - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नास्नोळा येथे दुचाकी आणि चारचाकीत अपघात, दुचाकीस्वार जखमी

नास्नोळा येथे दुचाकी आणि चारचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दुचाकी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

एसटीला आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण

गोव्यातील एसटी समाजाला आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण जाहीर होणार. त्यामुळे 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटीला आरक्षण मिळणार - मुख्यमंत्री

मनोज परबांनी तासाभरात भूमिका बदलून दिला स्वबळाचा नारा - पालेकर

इंडिया आघाडीअंतर्गत जागा वाटपावर चर्चेसाठी आरजीच्या मनोज परबांचा सुरुवातील होकार. तासाभरात भूमिका बदलून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय. मतदार शाहणे असून, भाजप विरोधात लढण्यासाठी सर्व एकत्र आल्याचे आपच्या अमित पालेकरांचे मत.

दुसरीकडे आरजीची इच्छा असल्यास चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याची पाटकरांची माहिती.

कळंगुट येथे गांजासह महाराष्ट्रातील एकाला अटक

पोरबोवाडा, कळंगुट येथे गांजासह उस्मानाबाद, महाराष्ट्र येथील एकाला अटक. अंकुश बाबू काळे (35) याच्याकडून 84 हजार किंमतीचा 840 ग्रॅम गांजा जप्त. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कळंगुट पोलिसांचा छापा. संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरु.

उत्तर आणि दक्षिण दोन्ही लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार!

गोव्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये इंडी आघाडीच्यावतीने असणार कॉंग्रेस उमेदवार. आपचे गोवा प्रमुख ॲड.अमित पालेकरांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांच्या उपस्थितीत घोषणा.

मांडवीत पडलेल्या जावेदचा मृतदेह अखेर सापडला

पणजी मांडवी किनारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर मृतदेह हा जावेद सडेकर याचा आहे. दोन दिवसांपूर्वी मांडवी पुलावर झालेल्या अपघातात जावेद हा दुचाकीवरून उसळून मांडवी नदीत पडला होता. तेव्हा पासून त्याचा शोध घेणं चालू होतं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT