today’s news Goa Marathi Dainik Gomantak
गोवा

Goa News: 25 महिलांना 16 लाडली लक्ष्मी आणि 9 गृह आधार चेक वाटून रक्षाबंधन एका अनोख्या पद्धतीने साजरी

Today's Marathi Breaking News Goa: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

चामुंडेश्वरी देवस्थानात 'जायांची महापूजा'उत्साहात

वरगाव-पिळगावच्या चामुंडेश्वरी देवस्थानात 'जायांची महापूजा'उत्साहात. महापुजेसाठी एक लाख जाईच्या फुलांचा वापर. तिसऱ्या श्रावणी शुक्रवारनिमित्त महाजनांतर्फे आयोजन

शिरोडा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

फोंडा पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी शिरोडा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली फर्मागुडी येथील रहिवासी आणि मूळ राजस्थान येथील एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोंडा पोलिस स्टेशन करत आहे.

मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनदिनी मतदारसंघातील भगिनींचा गराडा

रक्षाबंधनाच्या दिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी साखळी मतदारसंघातील महिला भगिनींनी, विद्यार्थिनींनी मोठी गर्दी करून मुख्यमंत्र्यांना राखी बांधल्या. मुख्यमंत्र्यांनी या सर्व भगिनींना शुभेच्छा व्यक्त करताना गोव्यातील महिलांच्या संक्षरणासाठी आपण सदैव तत्पर राहीन असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

फोंडा शहरातील विध्यार्थ्यांच्या मिरवाणुकीत नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार चालकाना फोंडा वाहतूक पोलिसांनी दिले चलन. कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

वाळपई नवोदय विद्यालयासाठी मंजूर झालेले निधी वापरता येणार नसल्यामुळे आवश्यक कामे प्रलंबित

वाळपई नवोदय विद्यालयासाठी मंजूर झालेले सुमारे साडेचार कोटी रुपयांचे निधी न्यायालयाच्या आदेशाशिवाय वापरता येणार नसल्यामुळे आवश्यक कामे प्रलंबित आहेत.

25 महिलांना 16 लाडली लक्ष्मी आणि 9 गृह आधार चेक वाटून रक्षाबंधन एका अनोख्या पद्धतीने साजरी

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी २५ महिलांना १६ लाडली लक्ष्मी आणि ९ गृह आधार चेक वाटून रक्षाबंधन एका अनोख्या पद्धतीने साजरे केले. लोकांना लाभ देणाऱ्या सरकारी योजना सहज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवन फिल्म फ्रॅटर्निटी घेतली भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवन फिल्म फ्रॅटर्निटी भेट घेतल्यानंतर बुधवारी गोवा राज्य चित्रपट महोत्सव-२०२५ ची अधिसूचना पुन्हा अधिसूचित करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT