New Goa DGP Alok Kumar ANI
गोवा

Goa News: पोलिस महासंचालक आलोक कुमार रुग्णालयात दाखल; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Breaking Marati News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

"मी माझ्या तपासणीसाठी आलो होतो," एसपी अक्षत कौशल

मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सत्तरी तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक

मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सत्तरी तालुक्यातील मामलतदार, पोलिस निरीक्षक (वाहतूक कक्ष), आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता (पीडब्ल्यूडी) आणि इतर अधिकाऱ्यांसह प्रमुख भागधारकांच्या उपस्थितीत वाळपई नगरपरिषद, वाळपईचे सरपंच आणि पंच यांच्यासोबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

मालपे पेडणे राष्ट्रीय महामार्ग 66 बायपास रस्त्यावरील दरड आणि संरक्षण भिंतीला धोका

मालपे पेडणे राष्ट्रीय महामार्ग 66 बायपास रस्त्यावरील दरड आणि संरक्षण भिंतीला धोका निर्माण झाला असून पावसात पुन्हा ती कोसळल्याची भीती राजन कोरगावकर व नागरिकांनी केली आहे.

काणकोण, साष्टी, सांगे, केपे आणि धारबांदोडा तालुक्याच्या काही भागात वीजपुरवठा बंद राहील

दक्षिण गोव्यातील शेल्डे आणि कुंक्कळी येथील ईएचव्ही उपकेंद्रांच्या देखभालीच्या कामासाठी आणि २२० केव्ही येणाऱ्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत लाईन्ससाठी वीज विभागाने रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे काणकोण, साष्टी, सांगे, केपे आणि धारबांदोडा तालुक्याच्या काही भागात वीजपुरवठा बंद राहील.

गोव्यात पुन्हा ऑरेंज अलर्ट

आयएमडीने २७ मे ते २९ मे २०२५ पर्यंत गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर ३० मे ते २ जून २०२५ पर्यंत यलो अलर्ट दिला गेलाय. दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'अटल आसरा योजना' अंतर्गत शिबिरांचे आयोजन

गोवा सरकारच्या समाजकल्याण संचालनालयामार्फत राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'अटल आसरा योजना' अंतर्गत पर्ये मतदार संघातील लाभार्थ्यासाठी खास आयोजित शिबिरांचे वाळपईत मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ देविया राणे व इतरांचा हस्ते उद्घाटन.

पोलिस महासंचालक आलोक कुमार यांना इस्पितळात दाखल करण्यात आले

दिल्लीहून काल गोव्यात परतलेल्या पोलिस महासंचालक आलोक कुमार यांना घरी छातीत कळा येऊ लागल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून दिवसभरात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

 गेल्या २४ तासांत म्हापसा येथे सर्वाधिक पावसाची नोंद

२६ मे २०२५ रोजी गोव्यातील विविध पर्जन्यमापक केंद्रांवर भारतीय प्रमाण वेळेनुसार गेल्या २४ तासांत म्हापसा येथे सर्वाधिक ७२.१ मिमी पाऊस पडला, तर धारबांदोडामध्ये सर्वात कमी २१.२ मिमी पाऊस पडला.

वाळपईत पोलिसांतर्फे भाडेकरु परताळणी मोहिम जोरात

वाळपईत पोलिसांतर्फे भाडेकरु परताळणी मोहिम जोरात, खास पोलित पथक तैनात, वाळपई ठाणे मार्गावरील प्रभाग 9 मध्ये तपास वेगात सुरु, कालपासून 4 जणांना घेतले ताब्यात.

उत्तर गोवा एफडीए टीमने डिचोली आणि कळंगुट येथे केली तपासणी

उत्तर गोवा एफडीए टीमने मंगळवार (दि. २७) डिचोली आणि कळंगुट येथे तपासणी केली. सहा परिसरांची तपासणी करण्यात आली. ४ दुकानांना वेअरिन सुधारणा नोटीस बजावण्यात आली, केरी येथील अस्वच्छ कामकाजामुळे एका दुकानाला कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आणि एका गोठवलेल्या मिष्टान्न उत्पादकाला ५००० चा दंड ठोठावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT