National Games 2023 Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवारी सर्व सरकारी कार्यालये दुपारी 1 नंतर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान दाबोळी विमानतळावर 6 वाजता उतरून रस्तामार्गे फातोर्डा स्टेडियमवर जाणार आहेत.
त्यादरम्यानच्या काळात दाबोळी विमानतळ-वेर्णा सर्कल-मडगाव जंक्शन आणि फातोर्डा स्टेडियमपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना विशेष सुरक्षा यंत्रणेने दिल्या होत्या. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी थांबवल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील सर्व सरकारी कार्यालये दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत. तसा अध्यादेशही काढला आहे.
पंतप्रधानांचे खास विमानाने शिर्डीहून दाबोळीच्या हंसा नौदल तळावर सायंकाळी ६वा. आगमन
नौदलाच्या जवानांकडून स्वीकारणार मानवंदना
हंसा नौदल तळावरील स्वागत कक्षात चहापान
विमानतळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर करणार स्वागत
हंसा तळावरून दिल्लीत नोंद असलेल्या बुलेटप्रुफ कारमधून पंतप्रधान फातोर्ड्याकडे होणार रवाना
या प्रवासादरम्यान पंतप्रधानांसोबत त्यांच्या कारमध्ये मुख्यमंत्रीही असू शकतील
दाबोळी ते वेर्णा, वेर्णाहून पश्चिम बगल मार्ग, घाऊक मासळी मार्केट, बसस्थानक मार्गे स्टेडियमकडे
ऐनवेळी नियोजनात बदल झाल्यास नौदलाकडून तीन हेलिकॉप्टर्सची सज्जता
मंचवरील उपस्थितांत राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असा क्रम
दाबोळी ते फातोर्डा मार्गावरील अंतर १८ मिनिटांचे
‘एसपीजी’चा जवानच चालवणार पंतप्रधानांची कार
फातोर्डा स्टेडियममध्येही चहापानाची व्यवस्था
स्टेडियमच्या पार्किंगमध्ये केवळ पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहने
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.