गोव्यातील आजच्या खास घडामोडी

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातील आजच्या खास घडामोडी

गोव्यातील आजचे विशेष कार्यक्रम..

दैनिक गोमन्तक

पणजी: इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9.30 वा. ख्रिसमस कार्ड स्पर्धा, तसेच उ.मा. व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर पेंटिंग स्पर्धा.

पार्से: चोनसाई येथील श्री राष्ट्रोळी मुजो देवाच्या जत्रोत्सवानिमित्त स. 10.30 वा. सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री 11 वा . ‘विघ्न निवारी गजमुख तारी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग.

फोंडा: दुर्भाट आगापूर पंचायतीतर्फे गोवा (Goa) मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत पातळीवर फुगडी स्पर्धा सायंकाळी 5 वा. दत्‍तमंडपात.

राय: कुण्णे येथील श्री संस्थान दत्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी, दु. 12 वा.24 तासांचा नामजप, आरती, महाप्रसाद, 3 वा. युवती महिला भजनी मंडळाचे भजन, सायं. 6 वा . अ.गो. पुरुष भजनी स्पर्धा नंतर स्थानिकांतर्फे भजन.

दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम

रुमड गुरुनाथ देवस्थान

रुमड - पाळी येथील श्री गुरुनाथ देवस्थानात दत्त जयंती उत्सव शनिवारी 18 रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी देवालयात अभिषेक तसेच इतर धार्मिक विधी होणार आहे. या उत्सवानिमित्त (Festival) देवालयात दुपारी महाप्रसाद, दत्तजन्म सोहळा तसेच संध्याकाळी पालखी मिरवणूक व भजनाचा कार्यक्रम होईल.

बांदोडा-पारपतीवाडा मंदिर

पारपतीवाडा-बांदोडा येथील श्री दत्तात्रय देवस्थान श्री दत्तजयंती उत्सव शनिवार 18 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी व दत्तमूर्तीस ग्रामस्थांकडून व भाविकांकडून अभिषेक होईल. दुपारी 12 वाजता आरत्या व महाप्रसाद होईल. दुपारी 3 वाजता होंडा सत्तरी येथील कीर्तनकार गुरुदास सुतार यांचे कीर्तन होईल. त्यांना तबला उमेश नाईक वसंवादिनी गोकुळदास रासईकर करतील. ठीक 4 वाजता दत्तजन्म सोहळा होईल. संध्याकाळी 5 वाजता मनोज केरकर रामनाथी पुरस्‍कृत बॅन्डबाजा सहित वाजत गाजत पालखी मिरवणूक पारपतीवाडा येथून वागदर, श्री नागेशस्थळ, रायंगिणीमार्गे रात्री 9 वाजता देवळात आगमन होईल. त्यानंतर ओवाळणी, आरत्या, तीर्थप्रसाद व पावणी होऊन उत्सवाची सांगता होईल. यजमानपद माड्डू व महिमा नाईक भूषवतील. सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्‍थानतर्फे करण्यात आले आहे.

म्हार्दोळ देवस्थान

म्हार्दोळ येथील श्री दत्तात्रय देवस्‍थानात शनिवारी 18 रोजी श्री दत्तजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यानिमित्त सकाळी 7 ते 11 पर्यंत अभिषेक, दुपारी 12.30 वाजता आरती, तीर्थप्रसाद, संध्याकाळी 5 वाजता दत्त जन्मपूजा व आरत्या संध्याकाळी 6 वाजता श्री हनुमान ब्रास ब्रॅण्ड कंपनी बाणस्तारी यांच्या पथकासह संपूर्णगावात पालखी मिरवणूक. त्यानंतर पावणी व आरती होऊन उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री दत्तात्रय देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

करंजाळ-मडकई मंदिर

करंजाळ-मडकई येथील श्रीदत्त मंदिर पारांपई येथे दत्तजयंती उत्सव शुक्रवारी 17 व शनिवारी 18 रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यानिमित्त 17 रोजी दिवसभर धार्मिक विधी होतील. संध्याकाळी 7.30 वाजता प्रसिध्द गोमंतकीय कलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. 18 रोजी सकाळी 9 वाजता लघुरुद्र व धार्मिक कार्यक्रम, 12 वाजता भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी 5.30 वाजता दत्तजन्म आरती व नंतर महाप्रसाद होईल. संध्याकाळी 7.30 वाजता श्रींची पालखीतून करंजाळ गावातून मिरवणूक काढण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT