Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

'सत्तेत राहण्यासाठी भाजपने बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिले'

भाजप (BJP) आणि सभापती कार्यालयाने संगनमताने सत्तेत राहण्यासाठी बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : भाजप (BJP) आणि सभापती कार्यालयाने संगनमताने सत्तेत राहण्यासाठी बेकायदेशीर पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी केला आहे. भाजपचे हे कारस्थान लवकरच उघड होईल असे त्यांनी म्हटले आहे. फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पक्षांतर प्रकरणाने गोव्याची प्रतिमा खराब केली आहे. त्यावेळी भाजपला सत्तेत राहण्यासाठी 12 आमदारांनी पक्ष सोडून त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच या प्रकाराला त्यांनी विलिनीकरण असे म्हटले होते.

"या आमदारांच्या पक्षांतराने गोव्याची प्रतिमा खराब केली आहे आणि राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीची (पक्षांतरविरोधी) देखील हत्त्या केली आहे." असे सरदेसाई पुढे म्हणाले. सरदेसाई यांनी सांगितले की गोवा फॉरवर्डने, काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली कारण आमदारांचे हे विलीनीकरण बेकायदेशीर आहे याचे त्यांना माहिती हक्क कायद्या द्वारे पुरावे सापडले आहे . “भाजप आणि सभापती कार्यालयाने या पक्षांतरांना पाठिंबा दिला आहे.अशा प्रकारांमुळे विकास कामां मध्ये अडथळे निर्माण होत असल्याने अशा गोष्टी थांबवायला हव्यात." असे सरदेसाई म्हणाले.

“आमची हस्तक्षेप याचिका भाजप आणि सभापती कार्यालयाचा पर्दाफाश करेल, ज्यांनी बेकायदेशीरपणे पक्षांतर केले आणि गेली दोन वर्षे सत्तेत राहिले. भाजपने पक्षांतराला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याच्या प्रक्रियेत कसा फेरफार केला हे लोकांना कळेल.” असे ते म्हणाले.

गोव्याच्या राजकारणात नव्याने प्रवेश केलेले राजकीय पक्षही पैशाच्या जोरावर पक्षांतराला प्रोत्साहन देत आहेत, असेही ते म्हणाले. “गोव्यात निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर पक्षांतर होत आहे, कारण पैशाची ताकद असलेले राजकीय पक्ष त्याला प्रोत्साहन देत आहेत. हे सुद्धा आपण उघडकीस आणले पाहिजे.” असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT