गोवा

Goa News: गोव्यात घर बांधणे महागले; लोखंडी सळई, सिमेंटच्या दरात मोठी वाढ

Pramod Yadav

पणजी: स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आजच्या काळात, घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. घर बांधताना त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याच्या किमती कमी होण्याची वाट नागरिक पाहत असतात, पण इतक्यात साहित्याच्य किमती कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत.

कारण, बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर सिमेंट आणि विटांचे भावही वाधारले आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बांधकाम साहित्याच्या किमती झपाट्याने घसरताना दिसल्या. पण ही घसरण महिनाभरातच आटोक्यात आली असून, घरासाठी आवश्यक असणाऱ्या सळईच्या किमती वाढू लागल्या आहेत. आत्तापर्यंत, अनेक शहरांमध्ये अवघ्या एका महिन्यात सळईच्या किमतीत 1500 ते 2000 रुपये प्रति टन वाढ झाली आहे. यामुळे घरासाठी होणाऱ्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.

सिमेंट-विटांप्रमाणेच, सळई देखील घराच्या बांधकामात वापरली जाणारी सर्वात महागडी वस्तू आहे आणि त्याच्या किमतीत बदल केल्यास तुमच्या बांधकाम खर्चात चढ-उतार होऊ शकतात.

साधारणपणे, पावसाळ्यात दर वेळी त्याच्या किमती कमी होतात. मात्र यावेळी देशात पावसाची संततधार सुरू असताना, लोखंडी सळ्यांच्या किमती मात्र सातत्याने वाढत आहेत.

TMT Steel Bar चे दर (18% GST वगळून)

१) गोवा - 46,400 रुपये/टन (जुना दर) / वाढलेला दर - 48,100 रुपये/टन

२) रायपूर (छत्तीसगढ) - 41,600 रुपये/टन - 44,200 रुपये/टन

३) दिल्ली - 45,500 रुपये/टन - 47,300 रुपये/टन

४) हैद्राबाद - 43,500 रुपये/टन - 44,800 रुपये/टन

५) कोलकाता - 41,800 रुपये/टन - 43,500 रुपये/टन

तुम्ही तुमच्या शहरातील लोखंडी सळईचे नवे दर Ironmart (ayronmart.com) वेबसाइटवर पाहता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

Goa Today's News Live: वेलिंगकरांविरोधात मडगाव पोलिस स्थानकावर निर्देशने!

IFFI Delegate Registration: तुमची उपस्थिती अगत्याची! 'इफ्फी'च्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात; जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार

Secunderabad Vasco-Da-Gama Express: तेलंगणातून गोव्यासाठी धावणार एक्सप्रेस; रविवारी शुभारंभ, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT