Goa Election Expenditure
Goa Election Expenditure  Dainik Gomantak
गोवा

Goa Election मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे! TMC अव्वल, खर्च तब्बल...

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा विधानसभा निवडणूकीत (Goa Assembly elections) विविध पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणूकीत भाजपने गोवा जिंकत आपले मागील वर्चेस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. पण, निवडणूक खर्चाची माहिती समोर आल्यानंतर ममता बँनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) गोवा निवडणूकीत सर्वाधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

गोवा विधानसभा निवडणूकीत ममता बँनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकद लावली. पण, खर्चाच्या बाबतीत ममता बँनर्जी यांच्या तृणमूलने बाजी मारली. तृणमूल काँग्रेसने गोवा निवडणूकीसाठी तब्बल 47.54 कोटी रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्याखालोखाल राज्यात आज सरकार असलेल्या भारतीय जनता पक्षाने 17.75 कोटी रूपये खर्च केला आहे. तर, दुसऱ्यांदा गोवा विधानसभा लढविणाऱ्या आपने आपल्या उमेदवारांसाठी 3.5 कोटी रूपये एवढा खर्च केला.

भाजपला मोठी टक्कर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेसने देखील विधानसभेत कोटी रूपयांचा खर्च केला आहे. काँग्रेसने (Congress) तब्बल 12 कोटी रूपये गोवा विधानसभेच्या निवडूकीत खर्च केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) अकरा उमेदवार यावेळी गोव्याच्या निवडणूकीत उभे होते. राष्ट्रवादीने निवडणूत 25 लाख रूपये खर्च केल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Uddhav Thackray Shivsena) गोवा निडणूकीसाठी 92 लाख रूपये खर्च केले. शिवसेनेचे दहा उमेदवार रिंगणात होते.

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा सल्ला आणि रणनीतीच्या आधारे तृणमूल काँग्रेसने गोव्यात 23 जागांवर नशीब आजमावले पण, एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तृणमूलने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती केली होती. एमजीपीने 13 जागा लढवत दोन जागा जिंकल्या. आम आदमी पक्षाने 39 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी दोन जागांवर त्यांना यश मिळाले.

भाजपने गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपने वीस जागांवर विजय मिळवला. त्यांना दोन अपक्ष आणि दोन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने पांठीबा दिल्यानंतर भाजने गोव्यात सरकार स्थापन केले. दरम्यान, अलिकडेच गोव्यात आलेल्या राजकीय वादळात काँग्रेसच्या निवडून आलेल्या अकरा आमदरांपैकी आठ आमदार भाजपात दाखल झाले. त्यामुळे भाजपचे बळ वाढून 38 वर पोहचले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT