TMC nominated Luisin Falero to Upper House of Parliament Dainik Gomantak
गोवा

लुईझिन फालेरोंना TMCकडून राज्यसभेचं तिकीट

सुष्मिता सिंह देव (Sushmita Singh Dev) यांच्या पाठोपाठ आणखी एका काँग्रेसी, आयात नेत्याला ममता बॅनर्जी यांनी तातडीने राज्यसभे्वर पाठविण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत.

दरम्यान, तृणमुल पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (Luisin Falero) यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. फालेरो यांनी 29 सप्टेंबरला त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता अवघ्या दोन महिन्याच्या आतच फालेरो यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली. सुष्मिता सिंह देव यांच्या पाठोपाठ आणखी एका काँग्रेसी, आयात नेत्याला ममता बॅनर्जी यांनी तातडीने राज्यसभे्वर पाठविण्याचा निर्णय घेतला.

तसेच, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) गोव्यात (Goa) सर्व म्हणजेच 40 मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. राज्यातून भाजप (BJP) सरकार हटविणे हाच निवडणुकीत मुख्य मुद्दा असणार आहे. अशी माहिती गोवा तृणमूल काँग्रसचे नेते लुईझिन फालेरो (Luisin Falero) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी अखेर त्यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य 10 जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आज ते गोव्यात परतले. सोमवारी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी आपल्या टीएमसी प्रवेशाबाबत कमालीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर त्यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लुईझिन फालेरो यांच्यासह अन्य 10 जणांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT