Tiswadi Traffic Jam Gomantak Digital Team
गोवा

Tiswadi Traffic Jam : चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची कोंडी; प्रवाशांची उडाली तारांबळ

पोलिस नसल्याने धक्क्यावर दुचाकी व वाहनांची गर्दी होऊन चक्का जाम झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi Traffic Jam : चोडण फेरी धक्क्यावर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले पोलिस आज अचानक गायब झाले. त्यामुळे या मार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली. मोठ्या प्रमाणात आलेल्या दुचाकीस्वारांनी तर कहर केला होता. पोलिस नसल्याने धक्क्यावर दुचाकी व वाहनांची गर्दी होऊन चक्का जाम झाला.

रायबंदरहून आलेली वाहनेही फेरीबोटीतून काढण्यास मिळत नव्हती, यामुळे हा मार्ग काही काळ ठप्प झाल्याचे दृष्य दिसले. मागाहून आलेल्या फेरीबोटीही या मार्गावर ठप्प झाल्याने प्रचंड गर्दी दिसली. प्रवाशांना व वाहनचालकांना तर मनस्ताप सहन करावा लागत होता.

सरकारने व व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अशा स्थितीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. या मार्गावर दोन पोलिस तैनात करण्यात आले होते, त्यापैकी एका पोलिसाला बढती मिळाल्याने तो १५ दिवसापासून आला नाही. जुने गोवे चौकीचे निरीक्षक सतीश पडवळकर यांनी सांगितले की वाहतूक पोलिसांशी संपर्क साधा.

एकटा पोलिस कसे नियंत्रण ठेवणार ?

दुसरा पोलिस रघुनाथ नाईक आज सकाळी कर्तव्यावर तैनात होता, परंतु जस-जशी वाहने वाढू लागली व यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने तेथून त्याने काढता पाय घेतला. तिथून तो सरळ एका चहाच्या गाड्यावर उभा राहिला. यासंबधी त्याला विचारले असता तो म्हणाला की एकटा पोलिस दुचाकी व चार चाकी वाहनांच्या रांगेवर कसे नियंत्रण ठेवू शकतो, तुम्हीच सांगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT