Tirumala Tirupati Society Dainik Gomantak
गोवा

Tirumala Tirupati: सहकार निबंधकांच्‍या दणक्‍यानंतर ‘तिरुमाला तिरुपती’ भानावर! 13 ही शाखांचे अंतर्गत ऑडिट सादर करण्‍यास सुरुवात

Tirumala Tirupati Society Goa: तिरुमाला तिरुपती मल्‍टी को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीला राज्‍यात तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी सहकार खात्‍याने ‘एनओसी’ दिलेली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सहकार निबंधकांच्‍या दणक्‍यानंतर तिरुमाला तिरूपती मल्‍टी को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीच्‍या सर्वच शाखांनी अंतर्गत ऑडिटसह आवश्‍‍यक ती कागदपत्रे सहकार खात्‍याला सादर करण्‍यास सुरुवात केलेली आहे. परंतु, या सोसायटीच्‍या ना हरकत दाखल्‍यासंदर्भात (एनओसी) पुढील निर्णय राज्‍य सरकारवर अवलंबून असणार आहे.

तिरुमाला तिरुपती मल्‍टी को–ऑपरेटिव्‍ह क्रेडिट सोसायटीला राज्‍यात तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी सहकार खात्‍याने ‘एनओसी’ दिलेली होती. पण, वारंवार विनंती करूनही सोसायटीने सहकार खात्‍याला ऑडिट सादर केले नाही. त्‍यामुळे सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी काहीच दिवसांपूर्वी सोसायटीला तेरा शाखा सुरू करण्‍यासाठी दिलेली ‘एनओसी’ रद्द करण्‍याचा निर्णय घेतला.

सहकार निबंधकांच्‍या या निर्णयामुळे तिरुमाला तिरुपती सोसायटीच्‍या ठेवीदारांमध्ये खळबळ माजली. गुंतवलेले पैसे काढण्‍यासाठी त्‍यांनी आपापल्‍या शाखांमध्‍ये रांगा लावल्‍या. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडालेली होती. सहकार निबंधकांनी ‘एनओसी’ रद्द करण्‍याचा निर्णय घेताना व्‍यवहारांवर कोणतेही निर्बंध लादलेले नव्‍हते. त्‍यामुळे अनेक ठेवीदारांना मोठा दिलासा मिळालेला होता.

दरम्‍यान, ‘एनओसी’ रद्द झाल्‍यानंतर खडबडून जाग्‍या झालेल्‍या तिरुमाला तिरुपतीच्‍या संचालक मंडळाने मागील काही वर्षांत केलेले अंतर्गत ऑडिट तसेच सहकार खात्‍याला हवी असलेली कागदपत्रे सादर करण्‍यास सुरुवात केली आहे. त्‍याचा अभ्‍यास खात्‍याकडून सुरू करण्‍यात आला असून, यासंदर्भातील अहवाल लवकरच सरकारला सादर करण्‍यात येईल. त्‍यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, असे आपटे यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

‘माशेल महिला’बाबत सुनावणी

गेल्‍या काही वर्षांत घोटाळे समोर आलेल्‍या माशेल महिला

को–ऑपरेटिव्‍ह सोसायटीसह व्हिजनरी अर्बन को-ऑपरेटिव्ह

क्रेडिट सोसायटीसंदर्भातील सुनावण्‍या सुरू आहेत. त्‍याबाबतही

लवकरच निर्णय घेण्‍यात येणार असल्‍याचेही आशुतोष आपटे

यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दरोडेखोरांनाही कॅसिनोंचे आकर्षण

C K Nayudu Trophy: गोव्याच्या फिरकी गोलंदाजाचा भीमपराक्रम! 77 धावांत 11 गडी बाद; जम्मू काश्मीरचा दारुण पराभव

Goa Politics: 'काँग्रेसने आळस झटकून कामाला लागावे'! सरदेसाईंचा सल्ला; कार्निव्हलमध्ये दिली विजयाची खात्री

Arambol: 'परप्रांतीय घरात घुसले आणि... '! दलाल, बेकायदा गोष्टींमुळे हरमलवासीय संतप्त; कायदा हातात घेण्याचा दिला इशारा

GST: गोवा सरकारकडून 29137 कोटींचा महसूल जमा! राज्‍याला मिळाले 2039 कोटी; महसुलात वाढ

SCROLL FOR NEXT