Tilamol woman died electric shock Dainik Gomantak
गोवा

उदरनिर्वाहासाठी कष्ट करतानाच घात! आंबे काढताना महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

Tilamol woman died electric shock: कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कष्ट करणाऱ्या एका महिलेवर आंबे तोडतानाच काळाने घाला घातला.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कष्ट करणाऱ्या एका महिलेवर आंबे तोडतानाच काळाने घाला घातला. तीळामळ-शेळडे येथील निकेले ऑलिव्हेरो (वय ४२) यांचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

आंबे तोडण्यासाठी वापरलेल्या लोखंडी पाइपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला झाल्याने हा अपघात घडला. धक्का इतका भीषण होता की त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या.

तिळामळ येथील सुकोरीना फारिया या शेळडे येथील ‘ओ कारोलीना’ सभागृहात साफसफाईचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. अत्यंत साध्या परिस्थितीत कष्टाने संसार उभा करणाऱ्या या महिलेवर असा दुर्दैवी अंत ओढवला, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास त्या सभागृहाजवळील आंब्याच्या झाडावरील आंबे तोडत होत्या. मात्र, लोखंडी पाइपचा स्पर्श उच्च दाबाच्या वीजवाहिनीला होताच क्षणार्धात त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT