Sonali Phogat Death Anniversary: Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Death Anniversary: वर्ष उलटलं, गूढ कायम; 'त्या' दिवशी रिसॉर्टमध्ये सोनाली फोगटसोबत काय घडलं?

डिजिटल लॉकरमधून काय सत्य बाहेर येणार

Akshay Nirmale

Sonali Phogat Death Anniversary: टिकटॉकस्टार, भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यातील रिसॉर्टमध्ये झालेल्या संशसास्पद मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षी 23 ऑगस्टला सोनालीने या जगाचा निरोप घेतला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

23 ऑगस्ट 2022 रोजी सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला होता. त्यांना अतिरिक्त प्रमाणात ड्रग्ज दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

सोनाली फोगट यांचा मृत्यू 22 ते 23 ऑगस्ट 2022 या काळात गोव्यामध्ये झाला होता. तेव्हा त्यांच्यासमवेत त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी होता. सोनाली यांच्या कुटूंबीयांनी या दोघांवरच खूनाचा आरोप केला आहे. सुधीरला सोनालीची प्रॉपर्टी हवी होती. त्यामुळे त्याने जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सोनालीची हत्या केली.

गोव्यातील त्या रिसॉर्टमध्ये काय झालं?

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार सोनाली फोगटला तिचे दोन सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांनी अतिरिक्त प्रमाणात ड्रग्ज दिले. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. रिसॉर्टच्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही गोष्टी समोर आल्या.

पार्टीत दिले ड्रग्ज

सीबीआयच्या दाव्यानुसार, 23 ऑगस्ट रोजी सुखविंदरच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. त्या पार्टीत सोनालीला ड्रग्ज दिले गेले. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्याने ती डान्स फ्लोअरवरच बसली. साथीदारांनी तिला हॉटेलच्या खोलीत नेले. तिथे तिचा मृत्यू झाला. तिच्या सहकाऱ्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पण पोलिसांच्या प्रश्नांसमोर ते टिकू शकले नाहीत.

डिजिटल लॉकर उघडण्याची परवानगी

सोनाली फोगट यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरातदून CBI ने तपासावेळी एक डिजिटल लॉकर जप्त केला होता. गोवा कोर्टने आता सीबीआयला हे लॉकर उघडण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सुखविंदर याच्या वकीलांनीही लॉकर उघडण्यास आक्षेप घेतला नाही. त्यानंतर कोर्टाने हे लॉकर उघडण्याचे आदेश दिले.

या डिजिटल लॉकरमध्ये सोनाली आणि सुधीर यांची अनेक रहस्ये लपलेली असू शकतात. सोनालीच्या कुटूंबियांनीदेखील हे लॉकर उघडण्याची अनेकदा मागणी केली होती. सीबीआयने वारंवार विचारूनही सुधीरने या लॉकरचा कोड विचारला, पण त्याने सांगितलेल्या कोडवर लॉकर उघडलेले नाही.

शिक्षण

सोनाली यांचे शालेय शिक्षण फतेहाबाद येथील पायोनियर कॉन्व्हेंट स्कूलमधून केले. यानंतर हरियाणाच्या महर्षि दयानंद कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. हिसार दूरदर्शनमध्ये निवेदक म्हणून त्यांनी काम केले.

राजकारण

दहावी पास झाल्यानंतर सोनाली यांचे बहिणीच्या मेहुण्याशी लग्न झाले होते. तिचा पती संजय राजकारणात सक्रीय होता आणि 2016 मध्ये त्याचा मृतदेह त्यांच्याच फार्महाऊसवर सापडला होता. ही घटना घडली तेव्हा सोनाली मुंबईत होती.

करीयर

सोनाली टिकटॉक स्टार होत्या. टिकटॉकने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. 2016 मध्ये 'अम्मा - लाखोंकी माँ' या सीरियलमधून टीव्हीच्या दुनियेत पदार्पण केले. मालिकेत त्यांनी नवाब शाहच्या बेगम फातिमा यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्या चित्रपटांमध्येही दिसल्या. राजकारणातही नशीब आजमावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT