Porvorim Ex Ministers Son Bar Fight: पर्वरी येथील व्हिवा गोवा वाईन व डाईन या बार अँड रेस्टॉरंटसमोर गोव्याच्या एका माजी मंत्र्याच्या मुलाचा आपल्या प्रेयसीसह मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
तथापि, याबाबत पर्वरी पोलिस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
या व्हिडिओत दिसते की युवकाचा टी शर्ट फाटला आहे आणि त्याची मैत्रिण विरूद्ध गटातील मुलांशी ओरडून बोलत आहे.
गोवा आमचा आहे, म्हणत त्या युवतीची युवकांशी बाचाबाची होते. यानंतर युवतीचा मित्र आणि विरोधी गटातील युवकांमध्ये बारमध्येच धुसफूस सुरु झाली.
पण युवक आणि युवती बडबडत होते. त्यानंतर एक युवक थेट दुसऱ्या युवकावर धाऊन गेला. त्याला अडवायचा प्रयत्न तरूणी करत होती, पण तिला देखील यात मारहाण झाली आहे. काही काळी ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती.
हाणामारीला सुरवात झाल्यानंतर बार अँड रेस्टॉरंट चालकाने थेट शटर खाली ओढले. यावेळी येथील काही बाटल्या फुटल्याने बारचे थोडेफार नुकसानही झाले आहे.
त्यानंतर दोन्ही गटातील काहीजणांनी पुढाकार घेत हे प्रकरण मिटवले. कुणीही याबाबत पोलिसात तक्रार न केल्यामुळे या प्रकरणाची पोलिसांत नोंद झालेली नाही, असे समजते.
ही घटना दोन दिवसांपुर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. बाचाबाचीतून दोन गटांमध्ये मारामारीचा प्रकार घडल्याची सोशल मीडियात या व्हिडिओसह मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती.
अखेर माजी मंत्र्यांचा मुलगा आणि दुसऱ्या गटातील युवकांनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.