मडगाव: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे कौतुक केल्याप्रकरणी मडगावच्या व्यक्तीविरोधात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. भारतीय टायगर संघटनेच्या वतीने मडगाव, फातोर्डा आणि मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात राहुल शानबाग यांनी तक्रार दाखल केलीय. धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
राहुल शानबाग यांनी मडगावच्या गुजराती समाज परिसरात राहणाऱ्या बिलाल यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आलीय. बिलालने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याचे कौतुक करणाऱ्या स्टेट्स सोशल मिडियावर ठेवले होते.
अर्शदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले.
बिलालने पाकिस्तानच्या खेळाडूचे कौतुक करणाऱ्या स्टेट्स ठेवून समाजातील धार्मिक आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला. लोकशाही प्रधान भारतात नागरिकांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय खेळाडूंनी देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांची कमाई केली. याबाबत बिलालने कौतुक केले नाही. त्याला भारतीय खेळाडूंचे किंवा भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे कैतुक नसेल तर त्याने भारत सोडून पाकिस्तानात जावे.
पाकिस्तानात जाण्यासाठी आम्ही त्याला मदत करु. आणखी कोणाला जायचे असेल तरी देखील त्यांना तिकीटासाठी फंड गोळा करुन देण्याची व्यवस्था आम्ही करु, असे तक्रारीत म्हटलंय.
राज्यातील नागरिकांची शांतता आणि सलोख्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिलाल विरोधात कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.