Crime Dainik Gomantak
गोवा

टायगर अन्वरचा कर्नाटकातील हवेरीत खून

आपली जबरदस्त दहशत माजविलेला खतरनाक गुंड शेख अन्वर उर्फ (Sheikh Anwar) टायगर अन्वर याचा आज हवेरी कर्नाटक येथे खून करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोयत्याचा धाक दाखवून खंडणी वसूल करण्याचा आरोप असलेला आणि कित्येकांवर कोयत्याने हल्ले करुन आपली जबरदस्त दहशत माजविलेला खतरनाक गुंड शेख अन्वर उर्फ (Sheikh Anwar) टायगर अन्वर याचा आज हवेरी कर्नाटक येथे खून करण्यात आला. हा खून खंडणी प्रकरणातूनच झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) बबलू नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे. अन्वरच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालून त्याचा खून करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी आर्लेम येथे याच अन्वरवर जीवघेणा हल्ला झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला होता. या प्रकरणात नंतर फातोर्डा पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. या हल्ल्या नंतर अन्वरने आपले वास्तव्य कर्नाटकात हलविले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अन्वरने हवेरी येथील एका गॅरेजवाल्याला खंडणीसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती. एकूण चार भाऊ ती गॅरेज चालचायचे. आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अन्वर ही खंडणीची रक्कम वसूल कारण्यासाठी आला असता या चौघांपैकी एका भावाने, बाबलुने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. तिथेच तो तात्काळ गतप्राण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT