Divya Rane Gomantak Digital Team
गोवा

Water Conservation Project: केळावडेत उभारणार तीन जलसंवर्धन प्रकल्‍प

युवकांचे कार्य कौतुकास्‍पद : स्वखर्चाने उभारला प्रकल्‍प; गावकऱ्यांच्‍या चेहऱ्यावर समाधान

गोमन्तक डिजिटल टीम

सपना सामंत

अडचणी आल्याशिवाय माणसाला कोणत्याही परिस्थितीची जाणीव होत नसते. अजूनही कित्‍येकांना पाण्‍याचे महत्त्‍व समजलेले नाही. सत्तरीबरोबर गोव्याची जीवनदायिनी म्हणजे म्हादई नदी. तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. पाण्‍याचे महत्त्‍व लक्षात घेऊन केळावडे न्यू कॉलनी-सत्तरी येथील काही युवकांनी एकत्र येऊन जलसंवर्धनासाठी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.

‘केळावडे रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही संस्था यंदाही जलसंवर्धन करण्यासाठी प्रयत्‍नशील आहे. यावेळी संस्‍था तीन प्रकारे जलसंवर्धन करणार असल्याचे समजते. गेल्या वर्षी स्वखर्चाने त्यांनी हा प्रकल्प उभारला होता. मात्र यंदा ग्रामसभेत ठराव मांडून तो मंजूर करून घेतला आहे. पंचायतीच्या जीपीडीएस या योजनेखाली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर लवकरच योजनेचा लाभ घेता येईल.

त्याचबरोबर सरकारच्या जलस्रोत खात्‍यामार्फतही कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केलेला आहे. जर यास मान्यता मिळाली व निधी उपलब्ध झाला तर केळावडे भागात तीन प्रकल्प उभे राहतील. त्यात प्रथम कम्युनिटी जलसंवर्धन, कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा व छतावरील पाणी साठवणूक प्रकल्प राबविण्याचा विचार आहे.

केळावडे हा पुनर्वसन गाव. पूर्वी गावात सार्वजनिक पाणी विभागातर्फे कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जायचा. कालांतराने नळजोडण्‍या आल्‍या. मात्र तरीसुद्धा दिवसेंदिवस पाण्‍याची समस्या वाढतेच आहे. ही बाब लक्षात घेऊन केळावडे गावातील युवकांनी पुढाकार घेऊन पावसाचे पाणी साठवून त्याचे संवर्धन करण्‍याचे ठरविले. सुरूवातील कमी प्रमाणात पावसाचे पाणी संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्‍यात त्‍यांना यश आले. मग त्‍यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

भूगर्भातील जलपातळी वाढविण्‍यासाठी उपाय

भूगर्भातील पाण्याची पातळी तीन प्रकारे वाढविता येते. एक म्‍हणजे छपरावरील पाणी गोळा करून त्‍याचे संवर्धन करणे, दुसरे म्‍हणजे पाण्याचे प्रवाह वाढविण्यासाठी कुपनलिकेच्‍या आजूबाजूला खड्डे मारणे (पाणी अडवा-पाणी जिरवा) (असे केल्याने भगर्भातील पाणी बऱ्याच कालावधीसाठी साठवण्यास मदत होते) आणि तिसरे म्‍हणजे कुपनलिकेला वर्तुळ काढून जलशुद्धीकरण (फिल्टर मीडिया) करण्यासाठी उपाययोजना आखली जाते.

केरी पंचायत क्षेत्रातील रहिवासी विनय गावस यांना जलशक्ती जलसंपदा विभाग, नदी विकास मंत्रालयाचा ‘वॉटर हिरोज : शेअर युवर स्टोरी’ स्पर्धा 3.0 म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्‍यांचे अभिनंदन. केळावडे वॉटर हार्वेस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्‍यांनी उत्कृष्ट काम केले आहे. गोवा सरकार जलसंवर्धन आणि जलस्रोतांच्या शाश्वत विकास उपक्रमांसाठी वचनबद्ध आहे.

डॉ. दिव्या राणे, पर्येच्‍या आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT