Avtar 2 Release on OTT : बॉक्स ऑफिसवर कल्ला करुन आता ओटीटीवर येतोय अवतार 2....

जेम्स कॅमेरुनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' आता ओटीटीवर रिलीज होत आहे
Avtar 2 Release on OTT
Avtar 2 Release on OTT Dainik Gomantak

Avatar : The Way of Water Now on OTT : जेम्स कॅमेरॉनचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'अवतार: द वे ऑफ वॉटर' आता ओटीटीवर रिलीज होण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

जगभरात, या चित्रपटाने 2.32 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 19 हजार कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले. अवतारच्या चाहत्यांनी आता पेंडोरा आणि पाण्याच्या नव्या दुनियेत डुबकी मारायला तयार राहावं .कारण आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म 'Disney Plus Hotstar' वर रिलीज होणार आहे.

खास उन्हाळ्यासाठी रिलीज

असे समजते की 'डिस्ने प्लस हॉटस्टार' गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटाचे ओटीटी रिलीज पुढे ढकलत होते. हे आश्‍चर्यकारक होते, कारण आजकाल चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर दोनच महिन्यांनी OTT वर चित्रपट येण्याचा ट्रेंड आहे.

कित्येकदा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर केवळ सहा आठवड्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत.पण अवतारच्या बाबतीत ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी रिलीज करणार केल्याचे समजते. 'अवतार' फ्रँचायझी मुलांना खूप आवडली आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना पाण्याच्या प्रवासात घेऊन जावे, ही ओटीटी प्लॅटफॉर्मची इच्छा होती.

तुम्ही OTT वर 'अवतार' या प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल

 'अवतार: द वे ऑफ वॉटर' पुढील महिन्यात ७ जून रोजी 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर रिलीज होत आहे. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी, तुमच्याकडे या प्लॅटफॉर्मची मेंबरशीप असणं आवश्यक आहे. यात दोन प्रकारच्या योजना आहेत. 

जर तुम्हाला एचडी क्वालिटीमध्ये चित्रपट पहायचा असतील तर तुम्ही 899 रुपये खर्च करून एक वर्षाचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. पण जर तुम्हाला हा चित्रपट 4K क्वालिटीमध्ये पाहायचा असेल, तर तुम्हाला किमान रु.299 प्रति महिना किंवा रु.1499 प्रति वर्ष खर्च करून प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Avtar 2 Release on OTT
Esha Gupta in Cannes Film Festivel : कान्सच्या पहिल्याच दिवशी ईशा गुप्ताचा रेड कार्पेटवर बोल्ड ड्रेससह कहर..फोटो व्हायरल

अवतार 3 लवकरच

'अवतार: द वे ऑफ वॉटर' नंतर ही फ्रँचायझी पुढे नेणार असल्याचे जेम्स कॅमेरून यांनी आधीच जाहीर केले आहे. या फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये रिलीज होणार आहे. 'पाण्याचा मार्ग' जिथे संपला तिथून त्याची कथा सुरू होईल. 

दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन म्हणाले सध्या ते आणखी किमान दोन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये पंडोरा वर राहणाऱ्या नावीला विश्वाच्या इतर ग्रहांवर राहणाऱ्या लोकांशी सामना करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com