BJP national president Dainik Gomantak
गोवा

BJP Party President: भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक; गोव्यातले तीन मतदार कोण?

BJP President Election: देशातील पन्नास टक्के राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेले की राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे

Akshata Chhatre

BJP National President Election

पणजी: भारतीय जनता पक्ष, गोवा प्रदेशाकडून शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) रोजी केंद्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन मतदारांची निवड केली गेलीये. दिलिप परुळेकर, वासुदेव मेंग गावकर व सुवर्णा तेंडुलकर या तीन मतदारांची नेमणूक भारतीय जनता पक्ष गोवा तर्फे करण्यात आलीये. देशातील पन्नास टक्के राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेले की राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, या गेल्या काही दिवसांत उत्कंठा वाढवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शुक्रवार (ता.१७) सायंकाळी साडेसहा वाजता मिळणार आहे. भाजपच्या गाभा समितीची बैठक पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बोलावण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित राहतील.

शनिवारी सकाळी १० वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात होणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी मतदान घेण्याची वेळ आली, तर राज्य कार्यकारिणीचे ५४ सदस्य, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व खासदार सदानंद शेट तानावडे असे ५९ जण मतदान करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT