PM Kisan Yojana Dainik Gomantak
गोवा

'PM किसान अंतर्गत मिळालेले पैसे परत करा', गोव्यातील 3,000 शेतकऱ्यांना झटका

गोव्यातील जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा फायदा होत आहे.

Pramod Yadav

PM Kisan Samnan Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दर वर्षी देशातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रूपये दिले जातात. मात्र, गोव्यातील तीन हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असून, त्यांना या योजनेअंतर्गत मिळालेले सहा हजार रूपये परत करण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोव्यातील तीन हजार शेतकरी आयकर आणि जमीन संबधित कागदपत्रांच्या नोंदी नसल्याकारणांना अपात्र ठरले आहेत. कृषी संचलनालयाने या शेतकऱ्यांना मिळालेले पैसे परत करण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने तीन हफ्त्यात दोन हजार रूपये असे एकून सहा हजार रूपये दिले जातात.

मात्र, परत करताना ही रक्कम एकरकमी परत करण्याची सूचना करण्यात आली आहे. शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत असताना अशा प्रकारची सूचना आणखी अडचणी वाढवणारी असल्याचे मत राज्यातील शेतकरी वर्गाने व्यक्त केले आहे.

गोव्यातील जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा फायदा होत आहे. दरम्यान, अशाप्रकारे पैसे परत करण्यास सांगितल्याने विविध आर्थिक समस्या निर्माण होणार आहेत. तसेच, पैसे जमा करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या पात्रतेची खातरजमा करायला हवी होती असेही काही शेतकरी म्हणत आहेत. शेतकऱ्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

तीन हजारपैकी 1,000 शेतकरी आयकर आणि उरलेले दोन हजार जमीन हक्क प्रकरणी अपात्र ठरले आहेत. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, योजनेचे पैसे परत करण्यास सांगितल्याने राज्यातील हे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT