The Three kings Feast  Dainik Gomantak
गोवा

Three kings Feast : गोव्यात साजरे होणारे 'थ्री किंग्स फेस्त' नेमके आहे तरी काय? वाचा सविस्तर

थ्री किंग्स फेस्तला तीनशे वर्षांची परंपरा

गोमन्तक डिजिटल टीम

The Three kings Feast : तीनशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कासावलीच्या डोंगरमाथ्यावरील रेमेद सायबिणीचे फेस्त आज शुक्रवारी उत्साहात साजरे करण्यात आले. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या ६ तारखेला हे फेस्त साजरे करण्यात येते. केवळ अर्ध्या दिवसाच्या या फेस्ताला मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत फेस्त साजरे करण्यात आले.

कासावलीच्या मुर्डी गावातील डोंगरमाथ्यावर निर्जनस्थळी अवर लेडी ऑफ रेमेडियोसचे सुंदर असे कपेल आहे. हे कपेल रेमेद सायबिणीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या फेस्ताचे मुख्य आकर्षण म्हणजे थ्री किंग्स मास्टर्स. हे मास्टर्स म्हणजे तीन किशोरवयीन मुले राजकुमारांच्या वेषात घोड्यावर स्वार होऊन प्रार्थनेला उपस्थित राहतात. हा मान फक्त कासावली, कुएली तसेच आरोसी गावातील मूल गावकार कुळातील मुलांनाच मिळतो. त्यांना 'रे" असेही म्हटले जाते. या थ्री किंग्सचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली जाते.

या कपेलकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. परंतु हे थ्री किंग्स डोंगराच्या पारंपरिक वाटेतूनच कपेलकडे येतात. या वेगळ्या परंपरेमुळे या फेस्ताला थ्री किंग्सचे फेस्त म्हणून संबोधले जाते. या अनोख्या परंपरेविषयी अनेक आख्यायिका गावातील जाणकारांकडून ऐकायला मिळतात. काहींच्या मते हे राजकुमार देवाचे दूत असून सुख व शांतीचे प्रतीक आहेत. फेस्ताच्या या वेगळ्या परंपरेमुळे ख्रिस्ती बांधवांपर्यंत या फेस्ताची कीर्ती पोहचलेली आहे.

ख्रिश्चन बांधवांप्रमाणे येथील हिंदूंची रेमेद सायबिणीवर श्रद्धा आहे. त्यामुळे मुर्डी व आसपासच्या गावातील हिंदू भाविकही या फेस्ताला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. फेस्ताच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. पहाटे पाच ते दुपारपर्यंत विशिष्ट वेळेतच हे फेस्त साजरे केले जाते. गेले नऊ दिवस नोव्हेनानिमित्त या निर्जनस्थळी जी भाविकांची वर्दळ होती ती दुपार पर्यंत संपुष्टात आली.

दरम्यान पहाटे ४ वा. पहिलीप्रार्थना सभा झाल्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत प्रार्थना सभा चालू होती. संध्याकाळच्या सत्रात चार वाजता सुरू झालेली प्रार्थना सभा ५ वा. संपली. या फेस्तासाठी मुरगाव तालुका व्यतिरिक्त गोव्यातील इतर भागातून मोठ्या संख्येने ख्रिस्ती तसेच हिंदू भाविक तसेच विदेशी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोर्तुगीज राजवटीत कासावले येथे कासावली रायाचो डोंगरावर १७२२ साली रेमेत सायबिणीच्या कपेलाची स्थापना केली होती. तेव्हापासून येथे रेमेत सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते. ख्रिस्ती बांधव येथे मोठ्या भक्तिभावाने फेस्त साजरे करतात तसा त्यांच्या तिथे मान आहे. तसेच ज्या घरातला मुलगा किंग होतो त्याला या फेस्तात मोठा मान असतो. संध्याकाळी ५ वा. शेवटची प्रार्थना सभा संपली की या कपेलकडे कोणीच राहत नाही अशी येथील प्रथा आजपर्यंत चालू आहे. त्यानुसार फेरीवाल्यांनी फेरी आटोपती घेतली.

यावर्षी एपिफनीची मेजवानी मानक कार्यपद्धतींचे पालन करून फेस्त साजरे करण्यात आले. ६ जानेवारी हा विशेष दिवस आहे, तिथे मग एपिफनीची मेजवानी साजरी करते, ज्याला सामान्यतः थ्री किंग्स फेस्त म्हणूनही ओळखले जाते. ही मेजवानी दक्षिण गोव्यातील चांदोर आणि उत्तरेकडील रेईस मॅगोस आणि कासावली या गावांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहाने साजरी केली जाते. पूर्वेकडील या ज्ञानी लोकांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा करणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण केले. कासावली लोकांसाठी एक विशेष सण असल्याचे भाविक सिरील फर्नांडीस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT