Loliem Crime Dainik Gomantak
गोवा

Loliem: लोलयेतील तीन घरे फोडून तीस लाखांचा ऐवज लंपास

Loliem Crime: लोलये क्षेत्रातील दापट येथील तीन बंद घरे फोडून एका घरातून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loliem Crime: काणकोणात लोलये पंचायत क्षेत्रातील बंद घरांवर चोरट्यांची लक्ष्य केले आहे. लोलये क्षेत्रातील दापट येथील तीन बंद घरे फोडून एका घरातून सुमारे तीस लाखांचा ऐवज लंपास केला आहे. त्यात सोन्याच्या दागिन्यांबरोबरच अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या सर्व बंद असलेल्या घरातील कुटुंबीय कामानिमित्त लंडनमध्ये आहेत.

दापट येथील आलुलिया फर्नांडिस यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व त्यांच्या घरातील कपाटे व सुटकेस फोडल्या. तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही, परंतु चोरट्यांनी घरातील किमती दारूच्या बाटल्या लंपास केल्या. या घराच्या जवळच असलेल्या लेलिस डिसिल्वा यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी दागिन्यांसह सुमारे तीस लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या.

त्याचप्रमाणे याच भागातील नातालिना कोर्त यांच्या घरात शिरून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त केले. या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही. यासंदर्भात येथील माजी पंच सनी कॉस्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीनही घरांतील कुटुंबीय परदेशात असतात. त्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेऊन चोरी केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात पैंगीण बाजारात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली. पैंगीण पंचायतीने बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यातील फुटेज पोलिसांनी तपासल्या असता अज्ञात चोरट्यांनी आपला चेहरा झाकला असल्याचे दिसून आले आहे.

बंद घरांची माहिती देण्याचे आवाहन

काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी काणकोणमधील रहिवाशांना बंद घरांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे संशयित व्यक्ती आपल्या भागात आढळल्यास त्यांचीही माहिती पोलिसांना त्वरित देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT