Goa Fire News : राज्यात आज दिवसभरात तीन भीषण आगीच्या घटना घडल्या. या तिन्ही आगींवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अशीच एक भीषण आगीची पहिली घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उसगाव, फोंडा येथे घडली. येथील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला भीषण आग लागली. आगीत २५ लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब लागले.
उसगावात गावकरवाडा ते कल्लभवाडा या भागात शुक्रवारी वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरा या भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजच्या वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य स्वीच बोर्डकडे मोठा आवाज आला आणि लगेच या फॅक्टरीत धूर पसरला. फॅक्टरीतील कामगारांना जाग आली. त्यांनी पाहिले तेव्हा फॅक्टरीत आग लागली होती.
घटनेची माहिती मिळताच फोंडा येथून दोन आणि कुंडई अग्निशमन दलाचा एक बंब उसगावात दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी बरेच परिश्रम घेतले.
दुसरी आगीची घटना नेसाय येथे घडली. येथील औद्योगिक वसाहतीतील भंगारअड्ड्याला आग लागली. सुक्या गवताने पेट घेतल्यानंतर लाकडांना आग लागली. त्यानंतर ही आग भंगारअड्ड्या पर्यंत पोहचली. मडगाव अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.
तिसरी आगीची घटना वेळ्ळीत घडली. वेळ्ळीतील बोना स्टील कारखान्याच्या भट्टीला आग लागली. ही दुर्घटना आज संध्याकाळी घडली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र वित्तहानी झाली.
कुंकळ्ळी अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच या आगीत 10 लाखांची मालमत्ता वाचवण्यात जवानांना यश आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.