Goa Covid-19 Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Updates: कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर होते, परंतु आज तिघांचा मृत्यू झाल्याने भीती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) कोरोना (Covid-19) नियंत्रणात असल्याने गेल्या आठवडाभर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, काल अचानकपणे तीन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याने राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होते आहे का अशी भीती निर्माण झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 601 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 लाख 75 हजार 724 रुग्ण बरे झाले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 17.84 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 392 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3 हजार 485 झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 3 रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. काल दिवसभर 2803 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर होते, परंतु काल तिघांचा मृत्यू झाल्याने भीती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT