Omicron Variant Dainik Gomantak
गोवा

राज्यात ओमिक्रॉनचा धोका कायम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्य सरकारच्यावतीने लसीकरणाचे वारंवार आवाहन करूनसुद्धा राज्यातील 1.3 लाख लोकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही.

दैनिक गोमन्तक

राज्य सरकारच्यावतीने लसीकरणाचे वारंवार आवाहन करूनसुद्धा राज्यातील 1.3 लाख लोकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका कायम असल्याचे मत मुख्यमंत्री (Chief Minister) प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

राज्यात आत्तापर्यंत 10 लाख 39 हजार 24 लोकांनी लसीकरणाचे (Vaccination) दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, अजूनही 1 लाख 30 हजार नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेणे टाळले आहे. यामुळे कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंट धोका कायम आहे. राज्यात सापडलेल्या ओमिक्रॉन संशयितांचे पुण्याला पाठविलेल्‍या नमुन्यांचे अहवाल उद्यापर्यंत मिळतील, अशी अपेक्षा आहे. या सर्व रुग्णांना कासावलीच्या आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात आल्‍याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोना मृत्‍युमुखी पडलेल्‍यांना अतिरिक्त 50 हजार : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्‍यांना यापूर्वी राज्य सरकारच्यावतीने 2 लाख रुपये देण्यात आले आहेत. आता यामध्ये केंद्र सरकारच्यावतीने (Central Government) 50 हजार रुपयांची जाहीर केलेली मदत देण्यात येत आहे. लवकरच ही मदत संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

441 पॉझिटिव्‍ह, 65 नवे रुग्ण

राज्यातील कोरोना नियंत्रणात असून गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही बळी नसला, तरी नवे 65 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 307 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 लाख 75 हजार 478 रुग्ण बरे झाले. हे बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के आहे. सध्या राज्यात 441 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही मृत्‍यू नाही. एकूण 3 हजार 388 एकूण मृत्‍युसंख्‍या आहे. गेल्या चोवीस तासांत 9 रुग्णांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. काल दिवसभर 3579 संशयित रुग्णांच्या (Patients) चाचण्या घेतल्या. त्यापैकी 65 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT