Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival In Goa: ‘सनबर्न’वर करडी नजर; श्‍वान पथकांसह हजारो पोलिस तैनात

Sunburn Festival In Goa: सरकारी यंत्रणा सज्ज : ड्रग्स विक्री-सेवन रोखण्यासाठी विशेष पथक

दैनिक गोमन्तक

Sunburn Festival In Goa: वागातोर येथे तीन दिवस (28 ते 30 डिसेंबर) होणाऱ्या सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलवर करडी नजर ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. या फेस्टिव्हलशी संबंधित असलेल्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह सुमारे 1 हजारांहून अधिक पोलिस दोन श्‍वान पथकांसह या भागात तैनात केले आहेत.

महोत्सवादरम्यान कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच ड्रग्स विक्री व सेवन रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. सनबर्नसह नववर्षारंभापर्यंत हा पोलिस बंदोबस्त असेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वीच पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मामलेदार यांचा समावेश असलेल्या उपसमित्या स्थापन केल्या आहेत. या उपसमित्या ‘राऊंड दे क्लॉक’ या ठिकाणी तैनात असतील. ड्रग्स तस्करीची शक्यता असल्याने आंतरराज्य बस स्थानके, रेल्वे स्थानक व गोव्याच्या चेकनाक्यांवरील तपासणी कठोरपणे केली जाईल.

सर्व हॉटेल्सना मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक 112 किंवा जवळच्या पोलिस स्थानकात देण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्यटकांना लुटणाऱ्या दलालांवर नजर ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे 600 हून अधिक टाऊट्सवर कारवाई झाली आहे. किनारपट्टी भागात पर्यटन पोलिस आहेत, त्यांची मदत घेण्यात आली आहे. त्यांना पोलिस खात्यातील अतिरिक्त कर्मचारी मदतीसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती वाल्सन यांनी दिली.

अत्याधुनिक यंत्रणा : ड्रग्ससेवन केल्याचे आढळल्यास संशयितांची तेथेच चाचणी घेतली जाईल व दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली जाईल. त्यासाठी ‘मोबाईल जलद स्क्रिनिंग चाचणी पद्धत’ अवलंबण्यात येणार आहे. नशाबाज व्यक्तीची थुंकी घेऊन घटनास्थळीच चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्तीकडे ड्रग्स असल्याचा संशय आल्यास चाचणीसाठी ‘रामन स्पॅक्ट्रो फोटोमीटर’ हे यंत्र वापरण्यात येणार आहे. ड्रग्स कोठेही लपविले तरी त्याचा अचूक शोध हे यंत्र घेते.

मोबाईल चोरांवरही ‘वॉच’

या फेस्टिव्हलमध्ये चोरांच्या टोळ्या येतात. पर्यटकांचे मोबाईल तसेच मौल्यवान ऐवज चोरणे, हे त्यांचे लक्ष्य असते. त्यामुळे या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. गेल्या वर्षी ‘सनबर्न’वेळी सुमारे ५० चोरांना अटक करून त्यांच्याकडून महागडे सुमारे १५० मोबाईल्स जप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT