Thivim Theft News Dainik Gomantak
गोवा

Thivim Theft News: आश्‍चर्यम्! जेसीबी मशीनचीही चोरी; माडेल-थिवीतील या प्रकाराने खळबळ

तिघांना अटक, शापोरा येथे गुपचूप नेले मशीन

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

Thivim Theft News: आतापर्यंत राज्यात दुचाकी-चारचाकी वाहनांच्या चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र, चक्क अजस्त्र जेसीबी मशीन चोरी केल्याचा प्रकार माडेल-थिवी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

थिवी येथील माडेल हाऊसिंग बोर्ड येथे खुल्या जागेत उभे केलेले जेसीबी मशीन (क्रमांक जीए-०१-एस-६५०२) चोरीस गेले. पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमनूर कडकल यांच्या लेखी तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी चौकशीसाठी त्वरित पथक तैनात केले.

या प्रकरणात तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. अखेर पोलिसांनी याप्रकरणी रवी धीरप्पा चव्हाण, (रा. साई कॉलनी, माडेल), रवी धकप्पा राठोड (रा. साई कॉलनी, माडेल) आणि प्रकाश सोमू राठोड या मूळच्या कर्नाटकातील तिघांना अटक केली.

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोलवाळ पोलिस करत आहेत.

संशयितांकडून गुन्हा कबूल

संशयितांनी ओव्हर-राइडिंग इग्निशन सिस्टीमद्वारे जेसीबी मशीन जबरदस्तीने सुरू करून हे ते शापोरा येथे नेऊन ठेवले. त्यांनी या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे कबूल केले. संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT