Victoria Fernandes Dainik Gomantak
गोवा

'Femina Miss India-23': यावर्षीची ‘मिस फेमिना- गोवा’

गोमन्तक डिजिटल टीम

'Femina Miss India-23' यंदाच्या ‘फेमिना मिस इंडिया- 23’ सौंदर्य स्पर्धेत व्हिक्टोरिया फर्नांडिस गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. अनेक ऑनलाईन-ऑफलाइन चाचण्यांमधून जात तिने या प्रतिष्ठित स्पर्धेत स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गोव्याच्या सुमारे 15 मुली ‘मिस फेमिना- गोवा’ बनण्यासाठी या स्पर्धेत उतरल्या होत्या. व्हिक्टोरियाने फॅशन उद्योगामधल्या आपल्या अनुभवाच्या बळावर तो मुकुट पटकावला.

व्हिक्टोरियाचे आई-वडील गोव्याचे असले व त्यांचे घर जरी गोव्यात असले तरी हे कुटुंब मुंबईला वास्तव्याला असते. व्हिक्टोरियाचे महाविद्यालयीन शिक्षण, बांद्रा येथील ‘सेंट अ‍ॅण्ड्रयूज’मधून पूर्ण झाले आहे.

एका लहानशा सौंदर्यस्पर्धेत भाग घेऊन तिने या क्षेत्रात आपला प्रवास सुरू केला. मात्र त्यानंतर व्हिक्टोरियाने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेल म्हणून काम केले आहे. भारतातल्या महत्त्वाच्या शहरात झालेल्या फॅशन शोमध्ये तिचा सहभाग राहिला आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फॅशन रचनाकारांसोबत काम करायची संधी तिला मिळाली आहे. ती अर्थातच हे मान्य करते की तिचा अनुभव तुलनेने कमी आहे पण तो समाधानकारक नक्कीच आहे आणि ती त्यात आनंदी आहे.

‘फेमिना मिस गोवा सौंदर्य स्पर्धे’ची पहिली फेरी ऑनलाइन होती. त्यानंतर झालेल्या राज्यवार निवडीच्या वेळी, स्पर्धकांना प्रत्यक्ष हजर राहून स्वतःची प्रतिभा सादर करायची होती. व्हिक्टोरियाने ती बाजी जिंकली.

राज्यवार निवड प्रक्रिया तुलनेने सोपी असली तरी पुढच्या मुख्य स्पर्धेसाठी मात्र व्हिक्टोरियाला कठोर प्रक्रियेमधून जावे लागणार आहे. तिची तयारी सुरू झाली आहे.

सध्या ‘फेमिना मिस इंडिया’च्या आयोजकांकडून मुख्य फेरीसाठी निवड झालेल्या 30 स्पर्धकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. चालणे, बोलणे, वेशभूषा अशा सर्व बाबतीत या प्रशिक्षणात भर दिला जातो. व्हिक्टोरिया सध्या या प्रशिक्षणात मग्न आहे.

भारतातील अनेक फॅशन रचनाकारांचे आणि मॉडेलचे लक्ष लागून असलेली ‘फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा’, एप्रिल महिन्यात मणिपूर येथील इंफाळ शहरात पार पडणार आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या सौंदर्यवतीला फॅशन जगतात कारकीर्द करण्याची मोठी संधी असते.

‘फेमिना मिस गोवा’ म्हणून निवड झालेली व्हिक्टोरिया सध्या मुंबई निवासी असली तरी ती आपल्या राज्याचे, गोव्याचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत करणार आहे. ती म्हणते, ‘गोव्याचे सौंदर्य, समुद्रकिनारे, चर्च या साऱ्यांतून निर्माण होणारी पवित्र भावना माझ्या हृदयात मी जपलेली आहे.’ ही भावना घेऊन मिस इंडिया बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व्हिक्टोरियाला ‘दैनिक गोमन्तक’च्या शुभेच्छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT